बिनविरोध निवडीची २५ वर्षांची परंपरा कायम; विल्होळीकरांचा आदर्श

विल्होळी ग्रुप विकास कार्यकारी सहकारी विकास सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी नवले, उपाध्यक्षपदी निंबेकर बिनविरोध
बिनविरोध निवडीची २५ वर्षांची परंपरा कायम; विल्होळीकरांचा आदर्श

नवीन नाशिक | प्रतिनिधी | New Nashik

विल्होळी ग्रुप विकास कार्यकारी सहकारी विकास सेवा सोसायटीची (Vilholi Group Development Executive Cooperative Development Services Society) पंचवार्षिक निवडणूक (Election) बिनविरोध पार पडली. यावेळी नवनियुक्त अध्यक्ष म्हणून वाळू नवले (Walu Navale) तर उपाध्यक्ष म्हणून दगडू निंबेकर (Dagdu Nimbekar) यांची निवड करण्यात आली....

कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शिवाजी चुंभळे (Shivaji Chumbhale), माजी नगरसेविका कल्पना चुंभळे, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र चारस्कर, माजी जिल्हा परिषद सदस्य बाबुराव रूपवते, गौळाण्याचे सरपंच अजिंक्य चुंभळे, विल्होळी सरपंच जानकीबाई चव्हाण, आंबेबहुला सरपंच अलकाबाई देशमुख, सारुळचे सरपंच सदानंद नवले यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक लढविण्यात आली.

बिनविरोध निवडीची २५ वर्षांची परंपरा कायम; विल्होळीकरांचा आदर्श
Visual Story : राज ठाकरेंना दुबईवरून धमकीचा फोन आला अन्...

यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी भाऊसाहेब काकड, गणपत नवले, प्रताप चुंबळे, बाळू भावनाथ, संजय घेळ, उत्तम थोरात, बाळू ढगे, बाळासाहेब नरवडे, झुणकाबाई थोरात, सुभाष चव्हाण, सोमनाथ भावनाथ, शिवाजी लोट, भास्कर थोरात, नामदेव भावनाथ, यशवंत भावनाथ आदींसह नागरिक उपस्थित होते.

मागील पंचवीस वर्षापासून विल्होळी विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूक बिनविरोध पद्धतीने पार पडत आहे. या अंतर्गत आंबे बहुला, सारुळ व विल्होळी ग्रामपंचायतीचा समावेश होतो. या करता कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शिवाजी चुंभळे यांचा नेहमीच पुढाकार असतो. ही बाब जमेची म्हणावी लागेल.

सोसायटीच्या अध्यक्षपदी निवड झालेले वाळू नवले यांनी क्रीडा स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांचा पूर्व राष्ट्रपती प्रतिभा पाटील व पूर्व पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी गौरव केला आहे.

बिनविरोध निवडीची २५ वर्षांची परंपरा कायम; विल्होळीकरांचा आदर्श
Visual Story : ...म्हणून धर्मवीर आनंद दिघेंनी नगरसेवकाच्या कानशिलात लगावली

गावातील एकमेकांचे संबंध व ऋणानुबंध कायम चांगले राहावेत. गावात एकजुटीने काम व्हावे. गावाचा विकास व्हावा. फालतू खर्चाला वाव मिळू नये. जिल्ह्यात गावाचे नाव आदर्श राहावे. या हेतूने ग्रामस्थांचे मत घेऊन मागील पंचवीस वर्षापासून सोसायटीची निवडणूक बिनविरोध पद्धतीने पार पाडत आहोत. यात समाधान वाटते. हा आदर्श सर्वांनी घ्यावा असे आवाहन मी यानिमित्ताने करतो.

- शिवाजी चुंभळे, माजी सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, नाशिक

Related Stories

No stories found.