
सुरगाणा | प्रतिनिधी | Surgana
येथील सुरगाणा कृषी उत्पन्न बाजार समितीची ( Surgana APMC) निवडणूक (Election) नुकतीच शांततेत पार पडली. यामध्ये माकप प्रणित किसान विकास प्रगती पॅनलच्या १७ पैकी १६ जागा माजी आमदार जे.पी.गावितांच्या (J.P Gavit) नेतृत्वाखाली बिनविरोध निवडून आल्या आहेत. तर एका जागी शिवसेना (Shivsena) (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचा उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे...
किसान विकास प्रगती पॅनल आणि शेतकरी विकास पॅनलने एकमेकांविरोधात ही निवडणूक लढवली होती. माकप, भाजप, ठाकरे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, हे तालुक्यातील राजकीय पक्ष आहेत. ज्याप्रमाणे ग्रामपंचायत जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी सर्व पक्ष सत्तेसाठी जोरदार प्रयत्न करत असतात त्याचप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माकप प्रणित पॅनल वगळता इतर पक्षात उत्सुकता दिसून आली नाही.
यावेळी किसान प्रगती पॅनलमधील अलंगूनचे सरपंच हिरामण गावित, पंचायत समितीचे माजी सभापती इंद्रजित गावित, उत्तम कडू, सावळीराम पवार, माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष चौधरी, भिका राठोड यांच्यासह आदी उमेदवार सुरगाणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत उतरले होते. तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून तालुकाप्रमुख मोहन गांगुर्डे, सरपंच अशोक गवळी, यांच्यासह आदी निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. मात्र, ही निवडणूक बिनविरोध झाल्याने पंधरा ते वीस वर्षांपासून बाजार समितीवर असलेले माकपचे वर्चस्व पुन्हा एकदा कायम राहिले आहे.
बाजार समितीवर विविध गटांतून निवडून आलेले उमेदवार खालीलप्रमाणे
सोसायटी सर्वसाधारण - उत्तम कडू, मोहन गांगुर्डे, सुभाष चौधरी, भरत पवार, सावळीराम पवार, तुळशीराम भोये, अशोक भोये महिला राखीव - संजाबाई खंबाईत, पार्वताबाई गावित इतर मागासवर्ग - शेख अब्बास हुसेन भटक्या जाती - शेख अब्बूकर महमद ग्रामपंचायत गट- पुंडलिक भोये, हिरामण गावित, भिका राठोड, भास्कर जाधव व्यापारी गट - गौतम चंद पगारिया,मोहन मुरलीधर राऊत