सिद्धिविनायक पतसंस्थेच्या अध्यक्षपदाची निवड बिनविरोध

सिद्धिविनायक पतसंस्थेच्या अध्यक्षपदाची निवड बिनविरोध

ओझर | प्रतिनिधी Ozar

नाशिक जिल्ह्यातील अग्रगण्य पतसंस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ओझरच्या सिद्धिविनायक नागरी सहकारी पतसंस्थेची Siddhivinayak Nagari Sahakari Patsanstha अध्यक्ष,उपाध्यक्ष पदाची निवडणूक Election of President, Vice President बिनविरोध पार पडली. अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणूकीत एकमेव अर्ज आल्याने प्रभाकरपंत आढाव यांची अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी अरविंद कदम यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले.यावेळी संचालक मंडळाने सर्वानुमते प्रशांत शेळके यांची ऑ. सेक्रेटरीपदी निवड निश्चित केली.

येथील अग्रगण्य पतसंस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिद्धिविनायक नागरी सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक याही वेळी बिनविरोध पार पडली. अध्यक्ष,उपाध्यक्ष पदासाठी झालेली निवडणूक देखील बिनविरोध पार पडली.सहाय्य निबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी रंजीत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या सभागृहात संपन्न झालेल्या या निवडणुकी प्रसंगी अध्यक्षपदासाठी प्रभाकरपंत आढाव यांच्या नावाची सूचना सुनील कदम यांनी केली.मंगला नाईक यांनी त्यांच्या नावाला अनुमोदन दिले.

यावेळी एकमेव अर्ज आल्याने प्रभाकरपंत आढाव यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी केली.उपाध्यक्षपदासाठी अरविंद कदम यांच्या नावाची सूचना विजयकुमार लढ्ढा यांनी केली.त्यांच्या नावाला बाळकृष्ण पगार यांनी अनुमोदन दिले.उपाध्यक्षपदासाठी अरविंद कदम यांचाही एकमेव अर्ज आल्याने त्यांचीही उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याने जाहीर करण्यात आले.यावेळी संचालक मंडळाने सर्वानुमते ऑ.सेक्रेटरीपदासाठी प्रशांत शेळके यांचे नाव निश्चित केले.

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून रंजित पाटील यांनी तर सहाय्यक म्हणून संस्थेचे व्यवस्थापक विजय कदम यांनी काम पाहिले. यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत संस्थेचे महाव्यवस्थापक खंडेराव शेटे यांनी केले.याप्रसंगी संचालक सर्वश्री बबनराव कासार, बाळकृष्ण पगार, विजयकुमार लढ्ढा, सुनील कदम, मुक्तार कुरेशी, गणेश सिन्नरकर, राजेंद्र भवर, कृष्णा मंडलिक, सचिन म्हैसधुने, पंडित पल्हाळ,सौ.सुलोचना कदम,सौ.मंगला नाईक आदी उपस्थित होते.

संस्थेच्या स्थापने पासून आजतागायत संस्था आणि सभासदांचे हित हाच एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेऊन पारदर्शकपणे अविरत कार्य सुरू आहे.भविष्यातही संस्थेच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करून संस्था अधिकाधिक प्रगतीपथावर नेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू

- प्रभाकरपंत आढाव, अध्यक्ष सिद्धिविनायक समूह

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com