निफाड नगरपंचायत विषय समिती सभापती पदाच्या निवडी जाहिर

निफाड नगरपंचायत विषय समिती सभापती पदाच्या निवडी जाहिर
USER

निफाड। प्रतिनिधी | Niphad

निफाड (niphad) नगरपंचायतीच्या (nagar panchayat) विषय समिती सभापती पदाच्या (post of Speaker) निवडी नुकत्याच नगरपंचायत सभागृहात पिठासन अधिकारी तथा तहसिलदार शरद घोरपडे, नगरपंचायत मुख्याधिकारी डॉ.श्रीया देवचके यांच्या उपस्थितीत नगरसेवकांच्या बैठकीप्रसंगी करण्यात आल्या आहे.

नगरपंचायत सभागृहात प्रथम स्थायी समिती सभापतिपदी नगराध्यक्षा रुपाली विक्रम रंधवे यांची निवड करण्यात आली आहे. तर सदस्यपदी उपनगराध्यक्ष अनिल कुंदे, पल्लवी जंगम, संदिप जेऊघाले, किशोर ढेपले, साहेबराव बर्डे यांची वर्णी लागली आहे. तर सार्वजनिक बांधकाम समिती (Public Works Committee) सभापतिपदी किशोर शिवाजी ढेपले यांची निवड करण्यात आली असून सदस्यपदी अरुंधती पवार, डॉ.कविता धारराव, रत्नमाला कापसे, जावेद शेख यांची निवड करण्यात आली आहे.

महिला व बालकल्याण समिती (Women and Child Welfare Committee) सभापतिपदी पल्लवी महेश जंगम यांची निवड करण्यात आली आहे. तर सदस्यपदी सुलोचना होळकर, अरूंधती पवार, विमल जाधव यांची निवड झाली आहे. स्वच्छता (Hygiene), आरोग्य (health), शिक्षण (education) व सांस्कृतिक कार्य समिती (Cultural Working Committee) सभापतिपदी साहेबराव काळू बर्डे

यांची निवड करण्यात आली असून सदस्यपदी कांताबाई कर्डीले, अरुंधती पवार, डॉ.कविता धारराव, विमल जाधव यांची निवड करण्यात आली आहे. पाणीपुरवठा व जलनिस्सारण समिती सभापतिपदी संदिप बाळासाहेब जेऊघाले यांची तर सदस्यपदी रत्नमाला कापसे, अलका निकम, शारदा कापसे, सागर कुंदे यांची निवड झाली आहे.

नियोजन व विकास समिती सभापतिपदी उपनगराध्यक्ष अनिल रंगनाथ कुंदे यांची निवड करण्यात आली असून सदस्यपदी सुलोचना होळकर, डॉ.कविता धारराव, कांताबाई कर्डीले, शारदा कापसे यांची निवड करण्यात आली आहे. विषय समिती सभापती निवडीत शहर विकास आघाडी, शिवसेना, काँग्रेस, बसपा, अपक्ष यांना संधी मिळाली आहे.

या निवडीप्रसंगी निफाडचे माजी नगराध्यक्ष राजाराम शेलार, शिवसेना जिल्हा युवा सेना प्रमुख विक्रम रंधवे, माजी नगरसेवक देवदत्त कापसे, बसपा जिल्हाध्यक्ष आसिफ पठाण, नंदू कापसे, दीपक गाजरे आदी उपस्थित होते. नगरपंचायत उपनगराध्यक्ष अनिल कुंदे यांनी निवड झालेल्या पदाधिकार्‍यांचे आभार मानले. याप्रसंगी नगरपंचायतीचे नगरसेवक उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com