
देवळा । प्रतिनिधी Deola
देवळा नगरपंचायतीच्या ( Deola Nagarpanchayat )नगराध्यक्षपदी सुलभा जितेंद्र आहेर यांची तर उपनगराध्यक्षपदी अशोक संतोष आहेर यांची नगरसेवकांच्या विशेष सभेत बिनविरोध निवड करण्यात आली. तहसीलदार तथा पीठासीन अधिकारी विजय सूर्यवंशी हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून यांनी ही निवड जाहीर केली.
देवळा नगरपंचायतीच्या तत्कालीन नगराध्यक्षा भारती आहेर व उपनगराध्यक्ष जितेंद्र आहेर यांनी आवर्त पद्धती नुसार राजीनामा दिल्याने या रिक्त पदांच्या जागेसाठी नवीन पदाधिकार्यांच्या निवडीसाठी आज नगरसेवकांची विशेष सभा घेण्यात आली.यावेळी नगराध्यक्ष पदासाठी सुलभा जितेंद्र आहेर व उपनगराध्यक्षपदासाठी अशोक संतोष आहेर या दोघांचा निर्धारित वेळेत एक एक उमेदवारी अर्ज दाखल झाला.
सुलभा आहेर यांच्या अर्जावर सूचक म्हणून सुनंदा आहेर आणि अनुमोदक म्हणून शीला आहेर यांची तर उपनगराध्यक्ष अशोक आहेर यांच्या अर्जावर सूचक म्हणून मनोज आहेर यांची तर अनुमोदक म्हणून करण आहेर यांची स्वाक्षरी होती.
निवडणुकीत पीठासीन अधिकारी विजय सूर्यवंशी यांंना मुख्याधिकारी नितीन बागुल यांनी सहाय्य केले . सुलभा आहेर ह्या नगरसेवक जितेंद्र आहेर यांच्या पत्नी आहेत देवळा नगरपंचायती पती-पत्नी एकाच निवडणुकीत विजय होण्याचा विक्रम त्यांनी केला आहे . ग्रामपंचायतीत हे दोघे उपसरपंच , सरपंचपदी होते. 20 वर्ष एकाच वार्डात निवडून येण्याचा विक्रम त्यांंनी केला आहे.
बैठकीस भारतीय जनता पक्षाचे गटनेते संजय आहेर ,नगरसेवक कैलास पवार, भूषण गांगुर्डे, सुनंदा आहेर, भाग्यश्री पवार, रत्ना मेतकर, अश्विनी चौधरी, राखी भिलोरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते संतोष शिंदे, ऐश्वर्या आहेर आदी सर्व नगरसेवक उपस्थित होते. यावेळी मजूर फेडरेशनचे माजी चेअरमन व नवनिर्वाचित संचालक सतिष सोमवंशी , माजी सरपंच भाऊसाहेब पगार , माजी नगराध्यक्षा धनश्री आहेर ,
माजी उपनगराध्यक्ष अतुल पवार ,लक्ष्मीकांत आहेर , भाजपचे तालुका अध्यक्ष किशोर चव्हाण , किशोर आहेर , प्रहारचे जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा जाधव, , डॉ. प्रशांत निकम , अनिल आहेर , अमोल आहेर , मुन्ना अहिरराव , माजी सरपंच नदिश थोरात , योगेश वाघमारे , प्रदीप आहेर ,दिलीप आहेर , सरपंच चंद्रकांत आहेर , प्रतीक आहेर ,
योगेश पाटील , बाळासाहेब गुंजाळ , डॉ . कोमल निकम , डॉ . अविनाश आहेर . नानू आहेर , बाळासाहेब मगर , भय्या आहेर , समाधान आहेर , साहेबराव आहेर ,श्रावण आहेर , सोनाथ वराडे ,किरण आहेर , विलास आढाव , मयूर आहेर , बापू आहेर ,अनिल रमन आहेर , आदी उपस्थित होते.