मविप्र निवडणूक : 'या' दालनात आखले जातायेत डावपेच

मविप्र निवडणूक : 'या' दालनात आखले जातायेत डावपेच

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

जिल्ह्यात (Nashik District) शिक्षण क्षेत्रात १०७ वर्षांची गौरवशाली परंपरा असलेल्या मराठा विद्या प्रसारक (मविप्र) समाज शिक्षण संस्थेच्या (Maratha Vidya Prasarak Samaj Sanstha) निवडणुकीचे (Election) पडघम आता वाजू लागले आहेत...

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा मविप्र संस्थेचे माजी संचालक डॉ. सयाजी गायकवाड (Dr. Sayaji Gaikwad) यांचे दालन आता या निवडणुकीचे डावपेच आखण्याचे केंद्रबिंदू ठरले आहे.

मविप्रचे माजी सभापती अ‍ॅड. नितीन ठाकरे (Adv. Nitin Thackeray), डॉ. विलास बच्छाव (Dr. Vilas Bacchav) यांच्यानंतर भाजपचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर (Keda Aher) यांनीही डॉ. गायकवाड यांची त्यांच्या दालनात भेट घेत चर्चा केली.

मविप्र शिक्षण संस्थेची पंचवार्षिक निवडणूक 14 ऑगस्ट 2017 रोजी पार पडली. यात संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार (Neelima Pawar) यांच्या नेतृत्वातील पॅनलने एकहाती विजय मिळवला. परंतु, इतर पदाधिकार्‍यांच्या व संचालकांच्या तुलनेत नीलिमा पवार यांना विजयासाठी मोठा संघर्ष करावा लागला.

गेल्या निवडणुकीत राहिलेल्या उणीवा शोधून आत्तापासूनच ‘डॅमेज कंट्रोल’ करण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरु केले आहेत. येत्या वर्षभरात संस्थेची निवडणूक होत आहे. त्याद़ृष्टिने सत्ताधारी गटाचे पदाधिकारी व संचालक आत्तापासून तयारीला लागले आहेत.

एकीकडे सत्ताधारी जोरदार तयारी करत असताना दुसरीकडे त्यांचे विरोधक म्हणून अ‍ॅड. नितीन ठाकरे, डॉ. सयाजी गायकवाड यांनीही अंतर्गत बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. या नेत्यांची पहिली बैठक उपाध्यक्षांच्या दालनात शुक्रवारी (दि.9) पार पडली.

त्यानंतर सोमवारी (दि.12) केदा आहेर यांनीही डॉ. गायकवाड यांच्याशी निवडणुकीच्या संदर्भात चर्चा केली. केदा आहेर स्वत: या निवडणुकीत उतरणार असल्याने विरोधकांच्या पॅनलला अधिक बळ देण्याचे प्रयत्न आतापासूनच सुरु झाले आहेत.

सत्ताधारी गटाच्या पदाधिकार्‍यांनी तालुकानिहाय भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली आहे. महत्वाच्या नेत्यांना तयारीला लागण्याचे आवाहनदेखील करण्यात आल्याचे समजते. त्यामुळे पुढील वर्षी होणार्‍या निवडणुकीचे वातावरण आत्तापासूनच तापायला सुरुवात झाली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com