स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून द्या: भुजबळ

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत  राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून द्या: भुजबळ

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये (Local bodie) जास्तीत जास्त उमेदवार निवडून आले तरच पक्षाची ताकद ही वाढत असते. त्यामुळे संपूर्ण तयारी करून ताकदीनिशी या निवडणुकीला (election) सामोरे जावे लागणार आहे.

त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीने तयारी करून आगामी जिल्हा परिषद (zilha parishad), पंचायत समिती (panchayat samiti), नगरपरिषद (nagar parishad), नगरपालिका (Municipality), महानगरपालिका (Municipal Corporation), बाजार समित्या व इतर सहकारी संस्थांवर जास्तीत जास्त उमेदवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (Nationalist Congress Party) निवडून येण्यासाठी नियोजन करा असे आवाहन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ (Former Deputy Chief Minister Chagan Bhujbal) यांनी केले.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष (Nationalist Congress Party) नाशिक शहर व जिल्हा आढावा बैठक (District review meeting) माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी भवन नाशिक येथे पार पडली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शहर व जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांकडून पक्षाच्या कामकाजाबाबत छगन भुजबळ (chagan bhujbal) यांनी आढावा घेतला. यावेळी भुजबळ म्हणाले की, इच्छुक उमेदवारांनी प्रत्येक घराघरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रचार आणि प्रसार करावा.

उमेदवारांनी आपली ताकद आणि तयारी अतिशय प्रभावीपणे करावी आणि जास्तीत जास्त उमेदवार कसे निवडून येतील यासाठी प्रयत्न करावे अशा सूचना त्यांनी उपस्थितांना केल्या. येणाऱ्या निवडणूका (election) या विविध पातळ्यांवर लढाव्या लागणार आहे त्यासाठी शिबिरांचे आयोजन करावे असे आवाहन त्यांनी केले. धर्माच्या वादात किंवा जातीपातीच्या वादात न पडता फुले शाहू आंबेडकरांचे समतेच्या विचारांवर आपण सर्वांनी काम करावे.

कारण देशातील सत्ता ही मोजक्या धर्मांध लोकांच्या हातात जाणे हे लोकशाहीसाठी अतिशय घातक असल्याचे त्यांनी सांगितले. विविध संस्थांवर एका विशिष्ट वर्गातील प्रतिनिधी प्रतिनिधित्व करत आहे. या संस्थांवर बहुजन समाजातील प्रतिनिधी निवडून द्यायला हवेत. सिनेट निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि समविचारी पक्षाचे प्रतिनिधी निवडणूक (election) लढत आहे.

या सर्वांना मोठ्या मताधिक्याने आपण निवडून द्यावे असे आवाहन त्यांनी केले. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, जिल्हाध्यक्ष ॲड.रवींद्र पगार, कार्याध्यक्ष विष्णूपंत म्हैसधूने, प्रदेश पदाधिकारी नाना महाले, दिलीप खैरे, बाळासाहेब कर्डक, अर्जुन टिळे, अशोक सावंत, माजी आमदार जयवंतराव जाधव, संजय चव्हाण, शिवराम झोले, मुंबई बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर, राजेंद्र डोखळे, ॲड. शिवाजी सहाने, डॉ.सयाजी गायकवाड, संजय बनकर, पुरुषोत्तम कडलग, सचिन पिंगळे,

माजी नगरसेवक गजानन शेलार, सुषमा पगारे, समिना मेमन, जगदीश पवार, हरीश भडांगे, डॉ.शेफाली भुजबळ, महिला जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे, महिला शहराध्यक्ष अनिता भामरे, कविता कर्डक, पूजा आहेर, आशा भंदुरे, किशोरी खैरनार, समाधान जेजुरकर, गौरव गोवर्धने, संजय खैरनार, महेश भामरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com