समृद्धी पॅनलच्या सर्व उमेदवारांना निवडून द्या : सुरज पटणी

समृद्धी पॅनलच्या सर्व उमेदवारांना निवडून द्या : सुरज पटणी

येवला | प्रतिनिधी | Yeola

येवल्याच्या अर्थकारणात आणि राजकारणात महत्त्वाची भूमिका निभवणाऱ्या येवला मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या (Yevla Merchant Co-operative Bank) निवडणुकीचा (Election) बिगुल अखेर वाजला आहे...

दि. 13 नोव्हेंबर रोजी प्रत्यक्ष मतदान होणार आहे. यासाठी समृद्धी पॅनलने प्रचारात आघाडी घेत गणपती मंदिर या ठिकाणी गणपती मंदिर या ठिकाणी नारळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.

याप्रसंगी येवला मर्चंट बँकेला अद्ययावत व समृद्ध करण्यासाठी समृद्धी पॅनलची स्थापना केली असून पॅनलच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून देण्याचे आवाहन माजी नगराध्यक्ष सुरज पटणी यांनी केले आहे.

तसेच बँकेचे जेष्ठ संचालक धनंजय कुलकर्णी आणि उद्योगपती मनीष काबरा यांनी देखील प्रचाराचा नारळ वाढवून बँकेच्या सभासदांना मतदानाचे आवाहन केले आहे.

याप्रसंगी माजी उपमहाराष्ट्र केसरी राजेंद्र लोणारी, बालू परदेशी, महेश भांडगे, शरद लहरे सीए सोमानी, चंद्रकांत कासार, सुहास भांबरे, शैलेश देसाई, डॉ. महेश्वर तगारे, अल्केश कासलीवाल, निरंजन परदेशी, मनोज दिवटे, सुभाष गांगुर्ड, प्रज्वल पटेल आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com