
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
भारतातील इलेक्ट्रिकल उपकरण निर्मिती उद्योगातील (Electrical Equipment Manufacturing Industries) सर्वोच्च संस्था दि इंडियन इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनतर्फे (The Indian Electrical and Electronics Manufacturers Association) उर्जेची पुनर्कल्पना - शाश्वत भविष्यासाठी
'इलेक्रामा २०२३' (Elekrama 2023) या प्रदर्शनाचे ग्रेटर नोईडा (Greater Noida) येथील इंडिया एक्स्पो मार्ट (India Expo Mart) येथे (दि. १८ ते २२ फेब्रुवारी) आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आयईईएमएचे उपाध्यक्ष सुनील संघवी (IEEMA Vice President Sunil Sanghvi) यांनी पत्रकार परिषदेप्रसंगी दिली.
यावेळी इलेक्रामा २०२३ (Elekrama 2023) या प्रदर्शनाबाबत माहिती देतांना संघवी यांनी सांगितले कि, या प्रदर्शनाचे सर्व स्टॉल बुक झाले असून या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाला ७० देशातील सुमारे ७०० उद्योजक भेट देणार असुन दिवसाला लाखो जण येथे भेट देणार आहेत. औद्योगिक उत्पादन (industrial production) वाढविण्यासाठी ‘मेक इन इंडिया’ (Make in India) सारख्या उपक्रमांमुळे राज्यातील ऊर्जाविषयक मूलभूत सोईसुविधांसाठी मोठ्या प्रमाणातील गुंतवणुकीचे नियोजन करण्यात आले आहे.
स्वच्छ ऊर्जा आणि वीज (Clean energy and electricity) हे या संक्रमणाचा गाभा असतील. पुढील २५ वर्षांमध्ये या क्षेत्रात सुमारे २ ट्रिलियन डॉलरची गुंतवणूक होईल व भारताच्या जीडीपीतील (GDP) आमच्या क्षेत्राचा वाटा टक्क्यांच्या प्रमाणात दुप्पट होईल आणि या क्षेत्राच्या निर्यातीत १० पट वाढ होईल, अशी आम्हाला अपेक्षा आहे. मोठ्या प्रमाणात ऊर्जा आयात करणाऱ्या देशाकडून ऊर्जा तटस्थ किंवा ऊर्जा निर्यात करणाऱ्या राष्ट्राकडे जाण्याची भारतासाठी ही सुवर्णसंधी आहे.
तरी प्रदर्शनास नाशिकच्या उद्योजकांनी उपस्थिती द्यावी असे आवाहनही यावेळी त्यांनी केले. यावेळी अपार इंडस्ट्रीज लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी शशी अमीन, मेको इन्स्ट्रुमेंट्स प्रायव्हेट लिमिटेडचे सीईओ कमल गोलिया, स्कोप टी अँड एमचे अध्यक्ष संजय कुलकर्णी, आयईईएमए वेस्टर्न रीजनचे अध्यक्ष राकेश मारखेडकर,आयईईएमए दक्षिण क्षेत्राचे अध्यक्ष आर. प्रकाश उपस्थित होते.