खडसेंचे मानसिक संतुलन बिघडले; पक्षांतरानंतर ते साधे आमदारही होऊ शकले नाहीत

खडसेंचे मानसिक संतुलन बिघडले; पक्षांतरानंतर ते साधे आमदारही होऊ शकले नाहीत

माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांनी डागली तोफ

नाशिक | प्रतिनिधी

वाढत असलेले वय, दुर्धर आजार आणि त्यात मुख्यमंत्री पदाची अपेक्षा असूनही एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये साधे आमदार देखील होता आले नाही. त्यामुळे खडसे यांचे मानसिक संतुलन बिघडत जात असल्याची टीका राज्याचे माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केली...

ते आज करोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक दौऱ्यावर असून त्यांनी बिटको हॉस्पिटल, डॉ झाकीर हुसेन हॉस्पिटल, जिल्हाधिकारी कार्यालय, मनपा आयुक्त कैलास जाधव यांची भेट घेऊन करोनाच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

राज्याचा मुख्यमंत्री होण्याची स्वप्ने आणि वाढत असलेले वय यामुळे राष्ट्रवादीत गेलेल्या एकनाथ खडसे यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. ते राष्ट्रवादीत गेल्यानंतर साधे आमदारही होऊ शकले नाहीत त्यामुळे विवंचनेत ते बोलत असतात असे आमदार महाजन म्हणाले.

गेल्या काही दिवसांपूर्वी जामनेर विधानसभा मतदार संघातील गावात प्रचंड पाणीटंचाई सुरु आहे. त्यामुळे येथील एका नागरिकाने थेट खडसे यांच्याकडे पाणीटंचाईबाबत व्यथा मांडली.

यावेळी खडसे यांनी खानदेशी भाषेत या नागरिकाशी चर्चा करताना आमदार महाजन यांच्यावर शेलक्या भाषेत टीका केली होती. याप्रसंगीची ऑडीओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर आज नाशकात आलेल्या महाजनांनी खडसे तोफ डागली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com