
नाशिक | Nashik
शहरातील गंगापूररोड भागातील (Gangapur Road Area) बांधकाम साईटवर एका युवकाच्या (Youth) डोक्यावर लाकडी ठोकळा पडल्याने त्याचा जागीच मृत्यू (Death) झाल्याची घटना घडली आहे...
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरुण कुमार मांडवी (वय १८, रा. नवश्या गणपती मंदिराजवळ, गंगापूररोड) असे मृत युवकाचे नाव असून तो गंगापूररोड भागातील एका बांधकाम साईटवर मजूर (laborer) म्हणून कार्यरत होता. दि. ३१ मार्च रोजी सकाळच्या सुमारास तो नेहमीप्रमाणे कामावर गेला.
त्यानंतर बांधकाम साईटवर पोहचल्यावर त्याने त्याचे काम सुरू केले. त्याचवेळी अचानक वरच्या माळ्यावरुन एक लाकडी ठोकळा त्याच्या डोक्यावर पडला. त्यामुळे अरुणच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर त्याचा रक्तस्राव झाल्याने साईटवरील संजय भगत यांनी त्याला श्री गुरुजी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार (Treatment) सुरु असतानाच त्याचा मृत्यू झाला.
दरम्यान, याप्रकरणी गंगापूररोड पोलिस ठाण्यात (Gangapur Road Police Station) अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील अधिक तपास पोलीस (Police) करत आहेत.