नाशिकला १८ मेट्रिक टन ऑक्सिजनचा तुटवडा; मागणी तिप्पट, चौपटीने वाढली

तुटवडा भरून काढण्यासाठी प्रयत्न; जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या रुग्णालयांना सूचना
नाशिकला १८ मेट्रिक टन ऑक्सिजनचा तुटवडा; मागणी तिप्पट, चौपटीने वाढली
Suraj Mandhare Collector Nashik

नाशिक | प्रतिनिधी

नाशिक मध्ये करोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे ऑक्सिजनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वाढलेल्या मागणीमुळे पुरवठा मात्र तेवढा होत नाहीये त्यामुळे शहरात ऑक्सिजनचा तुटवडा भासतो आहे. ज्या रुग्णालयांत तुटवडा आहे त्यांना आज दुपारी दोन वाजेपर्यंत ऑक्सिजनची सोय करून देण्यात येईल अशी माहिती जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिली...

ते आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. ते म्हणाले, नाशिकमधून सुरुवातीला १३८ मेट्रिक टन ची डिमांड होती. हि मागणी कमी करून आपण १२१ मेट्रिक टनवर आणली.

यानंतर दवाखान्यातील गळती, अतिवापर टाळून ती आपण १०३ मेट्रिक टनवर आणली होती. मात्र, प्रत्यक्षात आपल्याला पुरवठा हा ८५ मेट्रिक टन इतकाच होत आहे. त्यामुळे तुटवडा जाणवत असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.

जिल्ह्यात ऑक्सिजन वर असलेल्या रुग्णांची संख्या 7 हजार इतकी आहे. कमी अधिक प्रमाणात रुग्ण अनेक रुग्णालयात उपचार घेत आहेत.

प्राप्त माहितीनुसार अनेक रुग्णालयात 130 लिटर प्रति मिनिट असा वापर रुग्णालयांत होत आहे. त्यामुळे या रुग्णालयांनी ऑक्सिजनचा कमी प्रमाणात वापर करावा. गळती दुरुस्ती करून ऑक्सिजनचा वापर कमी करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

आज काही हॉस्पिटलच्या बाबतीत तुटवडा निर्माण झाला असून आजची अडचण दूर करण्याची ऑक्सिजन वितरकांना सूचना केली असून दुपारपर्यंत हा प्रश्न मार्गी लागेल असे त्यांनी सांगितले.

ऑक्सिजन टंचाईवर सगळ्यांनी मिळून मात करायला हवी. ऑक्सिजचा वापर फक्त फार्मासिटीकल कंपन्यांनी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com