संगमनेर । Sangamner (प्रतिनिधी)

तालुक्यातील 94 ग्रामपंचायतींपैकी अठ्ठेचाळीस ग्रामपंचायतींच्या सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडी नुकत्याच पार पडल्या. काही ठिकाणी झालेला किरकोळ गदारोळ वगळता मंगळवारी निवड झालेल्यांंपैकी 18 ग्रामपंचायतींचा कारभार महिला शक्तीच्या हाती आला आहे.

निवडणूक निर्णय अधिकारी अमोल निकम यांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यातील कर्हे येथील सरपंच पदावर खंडू सानप, उपसरपंचपदी ताई गुळवे, कौठे बुद्रुक येथील सरपंचपदी आशिष वाकळे, उपसरपंचपदी किरण वाकळे, पिंपळगाव माथा येथील सरपंचपदी सविता पांडे, उपसरपंचपदी नारायण भांगरे, लोहारा येथील सरपंचपदी ताराबाई सोनवणे, उपसरपंचपदी राहुल पोकळे, नांदुरी दुमाला येथील सरपंचपदी मीनानाथ शेळके, उपसरपंचपदी सोनबा पथवे, खांबे येथील सरपंचपदी रवींद्र दातीर, उपसरपंचपदी भारत मुठे, तर खांजापुर येथील सरपंचपदी तुषार सातपुते व उपसरपंचपदी गोविंद शिंदे यांची बिनविरोध निवड झाली आहे.

ओझर बुद्रुक येथील सरपंचपदी स्वाती गणेश खेमनर, उपसरपंचपदी संदीप दत्तात्रय नागरे, रायतेवाडी येथील सरपंचपदी सतीश गोरक्षनाथ तनपुरे, उपसरपंचपदी हरिभाऊ मारुती मंडलीक, कौठे धांदरफळ येथील सरपंचपदी विकास बबन घुले, उपसरपंचपदी आशा संदीप क्षीरसागर, डिग्रस येथील सरपंचपदी रखमा बाळा खेमनर, उपसरपंचपदी रंगनाथ भाऊसाहेब बिडगर, कुरण येथील सरपंचपदी मुदस्सर मन्सूर सय्यद, उपसरपंचपदी नदीम पीरमहंमद शेख, खरशिंदे येथील सरपंचपदी सविता भाऊराव वाडेकर, उपसरपंचपदी अशोक भास्कर बर्डे (बिनविरोध).

नांदूर खंदरमाळ येथील सरपंचपदी जयवंत गणपत सुपेकर, उपसरपंचपदी दिलीप काशिबा दुधवडे, जवळेबाळेश्वर येथील सरपंचपदी रामकृष्ण नाथा पांडे, उपसरपंचपदी अतुल हरिभाऊ कौटे, खांडगाव येथील सरपंचपदी भरत भीमाशंकर गुंजाळ, उपसरपंचपदी लक्ष्मीबाई संपत गुंजाळ,कुरकुंडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शाहीन पप्पू चौगुले, उपसरपंचपदी वनिता शरद वायळ, चनेगाव येथील सरपंचपदी अशोक गेणू खेमनर, उपसरपंचपदी गीतांजली विठ्ठलदास आसावा, माळेगाव पठार येथील सरपंचपदी ज्ञानेश्वर मुरलीधर पाण्डे, उपसरपंचपदी सुभाष भीमा गोडे, झरेकाठी येथील सरपंचपदी अशोक नानासाहेब वाणी, उपसरपंचपदी सुरज याकोब म्हंकाळे, भोजदरी येथील सरपंचपदी शिल्पा निलेश पोखरकर.

उपसरपंचपदी विनायक संतू शिंदे, प्रतापपूर येथील सरपंचपदी दत्तात्रय बाळकृष्ण आंधळे, उपसरपंचपदी संगीता गजानन आव्हाड, शिरसगाव धुपे येथील सरपंचपदी रामनाथ सखाराम गोडे, उपसरपंचपदी प्रवीण बबन दिघे, रायते ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी रूपाली गौतम रोहम, उपसरपंचपदी सुरज कैलास पानसरे सह इतर ग्रामपंचायत सरपंचपदी निवड प्रक्रिया पार पडली.