
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
पिंपळगाव बहुला (Pimpalgaon Bahula) येथे रस्त्याच्या कडेला खेळणाऱ्या एका आठ वर्षीय मुलीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात (Accident) तिचा दुर्दैवी मृत्यू झाला....
याबाबत पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार माया दत्तू वाघ (Maya Wagh) (८, रा. पिंपळगाव बहुला, सातपूर नाशिक) ही मुलगी (दि.२२) दुपारी १२:३० वाजेच्या दरम्यान निलेश भावले (Nilesh Bhavale) यांच्या भंगार दुकानाच्या बाहेर रस्त्याच्या कडेला खेळत होती.
यावेळी त्र्यंबकेश्वरकडून (Trimbakeshwar) नाशिककडे भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने तिला धडक दिली. या अपघातात (Accident) माया ही गंभीर जखमी झाली तिला उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात (Satpur Police station) अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनी अश्विनी पाटील (Ashwini Patil) करत आहेत.