गॅस पाईपलाईनच्या स्फोटात आठ कामगार जखमी

गॅस पाईपलाईनच्या स्फोटात आठ कामगार जखमी
USER

नवीन नाशिक | वार्ताहर | New Nashik

पाथर्डी परिसरात (Pathardi Area) नव्याने सुरू होणाऱ्या हॉटेल रेडिसनच्या (Hotel Radisson) किचनमध्ये गॅस पाईपलाईन (Gas Pipeline) टाकण्याचे काम सुरु होते. हे काम सुरु असताना गॅसचा स्फोट होऊन आठ कामगार जखमी झाल्याची घटना घडली आहे...

जखमी झालेल्या कामगारांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत इंदिरानगर पोलीस ठाण्यात (Indiranagar Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडोबानगर परिसरात (Khandobanagar Area) नव्याने रेडिसन हॉटेल सुरू होत आहे. नवीनच इमारत असल्याने हॉटेलची विविध कामे सुरू आहेत. किचनमध्ये गॅसची पाईपलाईन टाकण्याचे काम तसेच त्याची चाचणी घेण्याचे काम सुरू होते.

दिगंबर गवळी (Digambar Gawli) हे हॉटेलचे स्वयंपाकी रात्री आठ वाजता कामावरून घरी गेले. त्यानंतर सुमारे साडेनऊच्या सुमारास त्यांच्या सहकाऱ्यांनी फोन करून हॉटेलच्या किचनमध्ये स्फोट झाल्याचे सांगितले.

गॅस पाईपलाईन टाकण्याचे काम चालू असताना नायट्रोजन टेस्टिंग काम सुरू असताना हा स्फोट झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. स्फोटात किचनमध्ये काम करणारे संतोष मोतीराम राठोड, अक्षय पांडुरंग पोटाभट्टी, दिवाकर प्रसाद, अनिकेत वाल्मीक बोरसे, सुरज चंद्रकांत पाटील, निळकंठ राणा, रंजन सहदेव वर्मा, राजेश विश्वकर्मा हे कामगार जखमी झाले आहेत.

घटनेचे वृत्त कळताच इंदिरानगर पोलीस तसेच अग्निशमन दलाच्या पाचारण करण्यात आले. जखमी झालेल्या कामगारांना तत्काळ खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अधिक तपास इंदिरानगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीपाद परोपकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहे.

Related Stories

No stories found.