चिंचखेडमध्ये आठ ते दहा एकर ऊस जळून खाक

नाशिक | Nashik

दिंडोरी तालुक्यातील (Dindori Taluka) चिंचखेड (Chinchkhed) येथे दहा ते बारा एकर ऊसाला (sugar cane) आग (fire) लागल्याची घटना घडली आहे...

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सदर ऊसाच्या शेतावरून महावितरणची (mseb) मेन विद्युत लाईन गेलेली असून या विद्युत लाईनच्या स्पार्किंगमुळे आग लागल्याची घटना घडल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.या आगीत तीन ते चार शेतकऱ्यांचा तब्बल आठ ते दहा एकर ऊस जळून खाक झाला आहे.

दरम्यान, घटनास्थळी पिंपळगाव (Pimpalgaon) येथील अग्निशामक दल (fire brigade) पोहोचले असून आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरूआहेत. तसेच महावितरणच्या कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे हा प्रकार झाल्याचे संबंधित शेतकऱ्यांनी सांगितले. या आगीत मोठ्या प्रमाणावर नुकसान (Damage) झाले असून शासनाने त्वरित पंचनामे (Panchnama) करून संबंधित शेतकऱ्यांना (Farmers) तात्काळ भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com