जिल्ह्यात आठ हजार रुग्णांची करोनावर मात
नाशिक

जिल्ह्यात आठ हजार रुग्णांची करोनावर मात

करोनामुक्तीचे प्रमाण ७२.२६ टक्के

Abhay Puntambekar

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक शहर तसेच जिल्ह्यात करोनाचा उद्रेक सुरूच आहे. दररोज सरासरी २०० पेक्षा अधिक रूग्ण पॉझिटिव्ह येत आहेत. मात्र असे असले तरी करोनावर मात करणारांची संख्याही वाढत असून सरारी २५० पेक्षा अधिक रूग्ण दररोज करोनावर मात करत आहेत. शुक्रवार (दि.२४) पर्यंत ८ हजार १४७ जणांनी करोनावर मात केली आहे. मागील १५ दिवसात यातील ४ हजार २६१ जण करोनामुक्त झाले आहेत.जिल्ह्यात हे प्रमाण सरासरी ७२.२६ टक्के इतके आहे.

शहर तसेच ग्रामिण भागातील नवनव्या गावात करोनाचे रूग्ण आढळून येत असल्याने जिल्हा प्रशासनाची चिंता वाढत चालली आहे. करोनाग्रस्त, तसेच जोखमीच्या रूग्णांवर उपचार करण्यासाठी बेडची संख्या वाढवण्यात येत आहे.

तर आता घरीच कोरोंटाईन होऊन घरीच उपचार घेण्यासही परवानगी देण्यात आली आहे. दररोज पॉझिटिव्ह रूग्ण वाढत आहेत. सध्या नाशिक शहरातील रूग्णांची संख्या ६ हजार ४८४ झाली आहे. तर जिल्ह्यात करोनाग्रस्तांची एकुण संख्या ११ हजार २७४ झाली आहे. दुसरीकडे दररोज नव्याने दाखल होणार्‍या रूग्णांची संख्याही वाढत आहे.

एकाच दिवसात जिल्ह्यातून सरासरी ८०० पेक्षा अधिक नवे संशयित दाखल होत आहेत. तर जिल्ह्यातील बळींची संख्या ४३८ झाली आहे. असे असतानाही दिवसेंदिवस करोनावर मात करत पुर्ण बरे होणार्‍या रूग्णांची संख्याही वाढत चालली आहे. १ जुलै पासून सरासरी २०० पेक्षा अधिक रूग्ण दररोज बरे होत आहेत. असे आतापर्यंत ८ हजार १४७ रूग्णांनी करोनावर मात केली आहे.

यामध्ये २५० पेक्षा अधिक पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांचाही सामावेश आहे. बरे झालेल्यांमध्ये सर्वाधिक नाशिक शहरातील ५ हजार १०७ रूग्ण आहेत. ग्रामिण भागातील १ हजार ८४०, मालेगाव १ हजार ७१ तर १२९ जिल्हा बाह्य आहेत. परिणामी प्रत्यक्ष २ हजार ७४६ रूग्णच प्रत्यक्ष उरलले आहेत. यामुळे जिल्हा प्रशासनास मोठा दिलासा मिळाला आहे.

आतापर्यंत जिल्ह्यातून ३८ हजार ८६९ जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. यातील २६ हजार ६६१ निगेटिव्ह आले आहेत. ११ हजार २७४ पॉझिटिव्ह आले आहेत. यातील २ हजार ६८८ रूग्ण उपचार घेत आहेत.

करोनामुक्त रूग्ण

विभाग संख्या टक्के

नाशिक ५१०७ ७३.१०

मालेगाव १०७१ ८६. ५१

उर्वरित जिल्हा २८९५ ६३.५६

जिल्हा बाह्य १२९ ८३.२३

एकूण ८१४७ ७२.२६

Deshdoot
www.deshdoot.com