पीकविमा
पीकविमा
नाशिक

त्र्यंबकेश्वर : आठ हजार शेतकऱ्यांनी उतरविला पीक विमा

हरसूल कृषी मंडळ २ अव्वल

Gokul Pawar

Gokul Pawar

हरसूल l देवचंद महाले

त्र्यंबकेश्वर तालुक्यात यावर्षी सात हजार सातशे पाच पीक विमा शेतकऱ्यांसह चारशे अकरा वनपट्यांच्या अशा एकूण तालुक्यात आठ हजार एकशे सोळा शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला असल्याची माहिती कृषी अधिकारी संदीप वळवी यांनी दिली आहे.

दरम्यान त्र्यंबक तालुक्यात पावसाने सुरवात केली असली तरी अनेक पिकांना यापूर्वी फटका बसला आहे. त्यात करोना सारख्या विषाणू महामारीने ही शेतकरी भेदरलेल्या अवस्थेत दिसत आहे. यामुळे आर्थिक आणि शेतीरहित घडी बसवितांना शेतकऱ्यांची पुरती कोंडी झाली आहे. परिणामी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विम्याचे कवच भरतांना देखील नाकीनऊ आल्याचे चित्र पहावयास मिळाले.

यंदा पीकविमा भरणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये हरसूल कृषी मंडळ २ मध्ये सर्वाधिक म्हणजेच चार हजार पाचशे ब्याऐशी शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला असल्याने त्र्यंबकेश्वर तालुक्यात हरसूल कृषी मंडळ २ यावर्षी पीक विमा भरण्यात अव्वल ठरले असल्याचे हरसूल कृषी मंडळ अधिकारी डॉ.संजय पाटील, कृषी सहाय्यक अशोक कर्डेल यांनी सांगितले.

यंदा करोना सह पहिल्या टप्प्यात पावसाने दगा दिला. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागले. यामुळे पीक विमा सारख्या शेतकऱ्यांच्या कल्याणकारी योजनांना काही शेतकऱ्यांना मुकावे लागले असल्याचे ही चित्र आहे. तसेच शेवटच्या अंतिम मुदतीत सर्व्हरडाऊनचा फटका ही शेतकऱ्यांना सोसावा लागला आहे.

त्र्यंबकेश्वर तालुका कृषी मंडळ निहाय शेतकरी पीक विमा

१) हरसूल कृषी मंडळ १ : २३११ पीक विमा शेतकरी

२) हरसूल कृषी मंडळ २ : ४५८२

पीक विमा शेतकरी

३) त्र्यंबकेश्वर कृषी मंडळ : १२१२ पीक विमा शेतकरी

हरसूल कृषी २ मंडळात ३६ महसूल गावांचा समावेश आहे. यात जातेगाव ते मूलवड (जेमतेम ३० किमी अंतर)लांबी तर कसोली ते काकडदरी (२५ किमी) रुंदी असा परीघ आहे.

शेवटच्या तीन दिवसात सर्व्हरडाऊनमुळे पीक विमा भरण्यास अडचणी आल्या होत्या,मात्र त्यातून पर्याय काढण्यात आला असून शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात पीक विमा भरून घेतला आहे.यामुळे हरसूल कृषी मंडळ २ त्र्यंबकेश्वर तालुक्यात पीक विमा भरण्यात अव्वल ठरला आहे.

- डॉ.संजय पाटील, हरसूल २ कृषी मंडळ अधिकारी

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com