दिंडोरी तालुक्यातील आठ अहवाल पॉझिटिव्ह
नाशिक

दिंडोरी तालुक्यातील आठ अहवाल पॉझिटिव्ह

Nitin Gangurde

दिंडोरी । प्रतिनिधी Dindori

दिंडोरी तालुक्यातील अवनखेड येथील पॉलिझिंटा कंपनीतील कामगाराला करोनाची लागण झाली असुन वरखेडा, जऊळके दिंडोरी, जुने धागुर येथेही करोनाचे रुग्ण सापडले आहे. त्यामुळे रुग्ण संख्या 8 वर जाऊन पोहचली आहे.

दिंडोरी तालुक्यातील अवनखेड येथील पॉलिझिंटा कंपनीतील एका कामगाराला करोनाची लागण झाल्याचे आज आढळुन आले. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. वरखेडा, जुने धागूर येथे 45 आणि 48 वर्षीय महिलेला करोनाची लागण झाली आहे.

जऊळके दिंडोरी येथे 30, 32, 58 वर्षीय 3 महिलांना करोनाची लागण झाली आहे. दिंडोरी येथील जानकी संकुल येथे 35 वर्षीय पुरुष व 30 वर्षीयं महिलेला करोनाची लागण झाली आहे. आरोग्य यंत्रणेने तत्काळ दिंडोरी शहरात कारवाई सुरु केली आहे. तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ.सुजित कोशिरे यांनी संबंधित परिसरात जनतेला काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

प्रशासकीय नियमाची अंमलबजावणी व्हावी व दिंडोरीकरांचे आरोग्य सुरक्षित रहावे, यासाठी जनतेने शासकीय नियमांचे पालन करावे, मास्कचा वापर करावा, दिंडोरी शहरातील गर्दी टाळावी असे आवाहन प्रात अधिकारी डॉ. संदीप आहेर, तहसीलदार कैलास पवार, पोलिस निरीक्षक अनिलकुमार बोरसे, उपनिरीक्षक कल्पेशकुमार चव्हाण, तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ.सुजित कोशिरे, मुख्याधिकारी पाटील आदींनी केले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com