नाशिक विभागातुन आजपर्यंत सव्वा आठ लाख रुग्ण करोनामुक्त

विभागातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.19 टक्के
नाशिक विभागातुन आजपर्यंत सव्वा आठ लाख रुग्ण करोनामुक्त

नाशिक । Nashik

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन यंत्रणा, आरोग्य यंत्रणेच्या प्रयत्नातून नाशिक विभागात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण दिलासादायक आहे. विभागातून आजपर्यंत 8 लाख 66 हजार 287 रुग्णांपैकी 8 लाख 24 हजार 695 रुग्णांनी करोनावर मात केली आहे.

सद्यस्थितीत 29 हजार 792 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आजपर्यंत विभागात 11 हजार 757 रुग्णांचा मृत्यु झाला असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.19 आहे, तर मृत्युदर 1.35 टक्के इतका आहे. अशी माहिती आरोग्य विभाग नाशिक परिमंडळ कार्यालयाचे आरोग्य उपसंचालक डॉ. पी. डी. गांडाळ यांनी दिली आहे.

नाशिक विभागातून आजपर्यंत लॅबमध्ये 36 लाख 61 हजार 349 अहवाल पाठविण्यात आले असून त्यापैकी 8 लाख 66 हजार 287 अहवाल पॉझिटीव्ह आले असल्याची माहिती आरोग्य उपसंचालक डॉ. पी. डी. गंडाळ यांनी दिली आहे. नाशिक जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.06 टक्के नाशिक जिल्ह्यात आजपर्यंत 3 लाख 84 हजार 784 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 3 लाख 69 हजार 652 रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच 10 हजार 495 रुग्णांवर उपचार सुरु असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.06 टक्के इतके आहे. आजपर्यंत 4 हजार 637 रुग्णांचा मृत्यु झाला असून जिल्ह्याचा मृत्युदर 1.20 टक्के आहे .

अहमदनगर जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.32 टक्के

अहमदनगर जिल्ह्यात आजपर्यंत 2 लाख 59 हजार 783 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 2 लाख 45 हजार 042 रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच 11 हजार 629 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.32 टक्के इतका आहे. आजपर्यंत 3 हजार 112 रुग्णांचा मृत्यु झाला असून जिल्ह्याचा मृत्युदर 1.19 टक्के.

धुळे जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.36 टक्के

धुळे जिल्ह्यात आजपर्यंत 42 हजार 090 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 40 हजार 562 रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच 864 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.36 टक्के इतके आहे. आजपर्यंत 664 रुग्णांचा मृत्यु झाला असून जिल्ह्याचा मृत्युदर 1.57 टक्के आहे.

जळगांव जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 93.76 टक्के

जळगांव जिल्ह्यात आजपर्यंत 1 लाख 39 हजार 666 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 1 लाख 30 हजार 951 रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच 6 हजार 191 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 93.76 टक्के इतका आहे. आजपर्यंत 2 हजार 524 रुग्णांचा मृत्यु झाला असून जिल्ह्याचा मृत्युदर 1.80 टक्के आहे.

नंदुरबार जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.30 टक्के

नंदुरबार जिल्ह्यात आजपर्यंत 39 हजार 964 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 38 हजार 488 रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच 613 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.30 टक्के इतके आहे. आजपर्यंत 820 रुग्णांचा मृत्यु झाला असून जिल्ह्याचा मृत्युदर 2.05 टक्के आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com