गिरणारेत आठशे कुटुंबाना मिळतोय मोफत भाजीपाला

गिरणारेत आठशे कुटुंबाना मिळतोय मोफत भाजीपाला

देवळाली कॅम्प | Deolali Camp

नाशिक तालुक्यातील पश्चिम भागातील गिरणारे गावात गोदा काश्यपी फार्मर प्रोड्यूसर कंपनी च्या माध्यमातून 800 कुटुंब यांना मोफत भाजीपाला वाटप केला जात असून येथील शेतकरी यांना आपला माल कुठे विक्री करायचा ही समस्या देखील मार्गी लागली आहे.

जो पर्यन्त लॉक डाऊन सुरू असेल तो पर्यंत ही मोहीम सुरू राहणार असल्याची माहिती कंपनीचे चेअरमन व भाजपचे नाशिक तालुका अध्यक्ष नितीन गायकर यांनी दिली.

कडक लॉकड़ाऊंन ज़ाहिर झाल्या नंतर नितिन गायकर यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत गोदा काश्यपी फार्मर प्रोड्यूसर कंपनी यांनी गिरणारे येथे मोफत 800 कुटुंब यांनाभाजीपाला वाटप सुरू केले, ही सेवा पुढील लॉकडाउन जो पर्यंत राहाणार आहे. या कार्याने दुहेरी समस्या सुटली आहे.

शेतकरी यांना लॉक डाऊन मध्ये आपला माल कुठे विकावा ही भेडसावणारी समस्या दूर झाली आहे. शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन कंपनी माल खरेदी करत आहे. त्याचे होणारे पेमेंट रोख स्वरूपात दिले जात आहे, तर खरेदी केलेला भाजीपाला गावातील गरजवंत कुटुंबाना वाटप केला जातो.

या वेळी कंपनीचे चेअरमन नितिन गायकर, सीईओ सुभाष शिंदे,अरुण घुले, प्रवीण कोरडे, नानेश उगले, दादा गायकर, संदीप थेटे, स्वप्निल थेटे, अमोल मोरे नितिनथेटे, रंगनाथ दिवे, भास्कर दिवे, आदी उपस्थित होते.

हा आहे भाजीपाला

टोमेटो, गिलगा, शिमला मिरची, भेंडी, फ्लॉवर

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com