चार महिन्यांत आठ शेतकरी आत्महत्या

चार महिन्यांत आठ शेतकरी आत्महत्या
शेतकरी आत्महत्या

नाशिक ।

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी जिल्हाप्रशासनाने गठित केलेल्या टास्क फोर्सच्या प्रयत्नांना यश येत आहे. जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचा आलेख खालावला असून मागील चार महिन्यात आठ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. मागील वर्षापासून शेतकरी आत्महत्या रोखण्याच्या प्रयत्नाना यश मिळत असल्याचे आकडेवारीवरुन समोर येत आहे.

कर्जबाजारी, सावकारकीचा जाच, सततची नापिकी व दुष्काळ, शेतमालाला न मिळणारा हमीभाव, अवकाळी पाउस व गारपिट यांसह असंख्य आस्मानी व सुलतानी कारणांमुळे शेतकरी संकटात सापडला असून शेतकरी आत्महत्या दिवसेंदिवस वाढत आहे. सन २०१८ मध्ये जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येने शंभरी पार केली होती. तर, सन २०१९ मध्ये हा आकडा खालावला. ६८ शेतकऱ्यांनी जीवन संपवले होते. मात्र त्याची दखल घेत राज्य शासनाच्या सूचनेनूसार जिल्हाप्रशासनाने टास्क फोर्स गठित केले. त्यामाध्यमातून शेतकऱ्यांचे समुपदेशन करुन आत्महत्येपासून वंचित करण्यास जिल्हाप्रशासनाला यश आले. तसेच केंद्र व राज्य शासनाने शेतकर्‍यांसाठी विविध योजना अंमलात आणून शेतकर्‍यांना आर्थिक मदत केली. तसेच मागील दोन वर्षांपासून वरुण राजाने समाधानकारक हजेरी लावली. यासर्व बाबींचा परिणाम म्हणजे जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचा आलेख खालावल्याचे समाधानकारक चित्र आहे. बागलाण २, दिंडोरी, मालेगाव सुरगाण्यात प्रत्येकी १ व निफाडमध्ये तीन शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. करोना संकटाशी दोन हात करणाऱ्या जिल्हाप्रशासनाला काहिसा दिलासा मिळाला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com