Video : पहिनेबारीत तरुणांच्या दोन गटांत तुंबळ हाणामारी; आठ जणांना अटक, गुन्हा दाखल

Video : पहिनेबारीत तरुणांच्या दोन गटांत तुंबळ हाणामारी; आठ जणांना अटक, गुन्हा दाखल

नाशिक | प्रतिनिधी Nashik

गेल्या काही दिवसांपूर्वी पहिनेबारी (Pahine Bari) परिसरात नाशिकमधील काही तरुणांच्या गटांत पाण्यातच तुंबळ हाणामारी झाली होती. याप्रकरणी पोलिसांनी (Nashik Police) गंभीर दखल घेत धिंगाणा घालणाऱ्या आठ तरुणांच्या विरोधात वाडीवऱ्हे पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे....(Eight arrested vadivarhe police station area)

अधिक महिती अशी की, चार दिवसांपूर्वी दुपारच्या सुमारास निसर्गपर्यटनाचा (Nature Tourism) आनंद घेण्यासाठी काही तरुण पहिनेबारी परीसरात गेले होते. यावेळी येथील नेकलेस धबधब्याच्या नजीक तरुणांच्या दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली होती. घटनेचा व्हिडीओ समाजमाध्यमांत व्हायरल (Social Media viral) झाला होता.

यांनंतर वाडीवऱ्हे पोलीस ठाण्याचे (Vadivarhe police station) अंमलदार अमोल अंभोरे (Amol Ambhore) कर्तव्यावर असताना त्यांनी हा प्रकार पाहिला होता. याच वेळी त्यांनी संशयितांना ताब्यात घेतले होते. संशयित नरेश माणिक कजबे, गोकुळ हिरामण मोंडे, शुभम दीपक कापडणीस, राहुल प्रल्हाद गार्गुंडे सर्व राहणार सातपूर कॉलनी परिसर आणि दुसऱ्या गटातील महेश मारुती गिदाड, रवी दिवे, विजय शिवाजी मोडे, गुलाब दिवे सर्व राहणार ओझरखेड या दोन गटांच्या विरोधात वाडीवऱ्हे पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

आठही संशयितांना न्यायालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अनिल पवार (PI Anil Pawar) यांनी दिली.धिंगाणा घालणाऱ्या तरुणांवर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांनी दिले आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com