घरी नमाज पठण करतांना सय्यद परिवार
घरी नमाज पठण करतांना सय्यद परिवार
नाशिक

घरीच नमाज पठण; ईद-उल-अजहा उत्साहात साजरी

ईदगाह वरील सामुदायिक नमाज सोहळा रद्द; देशाच्या प्रगती साठी दुवा

Farooque Pathan

Farooque Pathan

नाशिक | फारूक पठाण

आज मुस्लिम बांधवांनी पवित्र ईद उल अजहा अर्थात बकरी ईदचा सण इस्लामी, पारंपारिक पद्धतीने घरीच नमाज पठण करून साजरी केला. सकाळी घरोघरी मुस्लिम बांधवांनी तसेच महिलांसह ज्येष्ठ नागरिक तसेच लहान मुला मुलींनी ईद निमित्त विशेष नमाज पठण केले तसेच जगाच्या शांततेसाठी, देशाच्या प्रगतीसाठी, एकात्मता अबाधित राहावी व शांतता कायम राहावी तसेच करोना लवकरात लवकर हद्दपार व्हावा यासाठी विशेष दुवा करण्यात आली.

दरम्यान शहर परिसरातील मशीन मध्ये देखील निवडक लोकांनी तिची विशेष नमाज पठाण केली. मात्र शहाजानी इदगाह मैदानावर होणारा सामुदायिक नमाज सोहळा यंदा करोनामुळे रद्द करण्यात आला होता. नमाज झाल्यानंतर मुस्लिम बांधवांनी घरोघरी कुर्बानी दिली.

एकमेकांना ईद मुबारक म्हणत शुभेच्छा दिल्या, लहानांनी मोठ्यांना सलाम करून ईद मुबारक शुभेच्छा देऊन आशीर्वाद घेतला. त्याच प्रमाणे घरोघरी गोड पदार्थ तयार करून विशेष फातेहा देण्यात आले.

दुपारपासून कुर्बानीचा प्रसाद वाटप करण्याची लगबग मुस्लिमबहुल भागात सुरू होती. जुने नाशिक परिसरात ईदच्या पार्श्वभूमीवर विशेष पोलीस बंदोबस्त तैनात करणार आला आहे. सोशल मीडियावर देखील ईदच्या शुभेच्छांचा वर्षाव होता, दूर राहणाऱ्या नातेवाईकांना फोन द्वारे शुभेच्छा देण्यात आल्या.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com