समाजाच्या स्वास्थ्य रक्षणासाठी ईदची नमाज

समाजाच्या स्वास्थ्य रक्षणासाठी ईदची नमाज
प्रातिनिधिक फोटो

सातपूर | Satpur

ईद-उल-फित्र म्हणजेच रमजान ईद पवित्र सणानिमित्त सातपूर येथील रजवीया मज्जित व सातपूर-अंबड लिंक रोडवरील नुरी मस्जिद येथे मोजक्या समाज बांधवांना समवेत नमाज अदा करण्यात आला. यावेळी संपूर्ण समाजाच्या आरोग्य रक्षणासाठी अल्लाकडे दुवा पठण करण्यात आले.

सातपूर येथील रजवीया मस्जिद येथे मौलाना अकबर मुशायरी मौलाना आफताब यांनी निवडक समाज बांधव व ट्रस्ट पदाधिकाऱ्यांसमवेत नमाज कला केली. यावेळी रुस्तम शेख मोसिन शेख इरफान खान हाजी फारूक पठाण सलीम शेख आदी मान्यवर उपस्थित होते.

सातपूर अंबड लिंक रोड वरील नुरी मस्जिद येथे मौलाना मन्नव्वर हुसेन मौलाना शकील यांच्या मार्गदर्शनाखाली निवडक लोकांसमवेत नमाज अदा करण्यात आली. यावेळी हाफिज अन्सारी यांच्यासह ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते.

या दोनही मस्जिदमध्ये नमाज अदा करण्यासाठी दरवर्षी चार ते पाच हजार मुस्लिम बांधव सहभागी होत असतात मात्र यंदाचा रमझान नमाजही साधे पणाने पार पडली. मुस्लिम बांधवांनी आपल्या घरातूनच नमाज अदा करून सर्व समाजाच्या स्वास्थ्यरक्षणासाठी दुवा पठण केले. परस्परांना आलिंगन देऊन भेटण्याच्या परंपरेला फाटा देऊन मोबाईल वरून शुभेच्छांच्या माध्यमातून ईद मुबारक करण्यात आले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com