निफाड कारखाना सुरू करण्यासाठी प्रयत्नः आ.बनकर

पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून
निफाड कारखाना सुरू करण्यासाठी प्रयत्नः आ.बनकर

पालखेड मि.। वार्ताहर Plakhed-Niphad

कर्मवीरांच्या त्यागातून निसाका (NISAKA), रासाका (RASAKA) या संस्था उभ्या राहिल्या असतांना काही कारणाने त्या बंद पडल्या आहे. अशा प्रसंगी या संस्था पुन्हा सुरू होण्यासाठी ज्या पद्धतीने संबधित विभागाकडे पाठपुरावा करावयास पाहिजे होता त्या प्रमाणात झाला नाही. परिणामी ऊस उत्पादकांसह (Sugarcane growers), मजूर, कामगार, छोटे-मोठे व्यवसायिक यांची वाताहात झाली.

रस्ते (road), विज, पाणी या मुलभूत गरजांपासून व विकासापासून तालुका काही वर्ष मागे गेला आहे. त्यामुळे पुन्हा नव्याने सहकार क्षेत्रासह विविध विकासकामे सुरू करण्यासाठी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) कटिबद्ध असून गेल्या सहा वर्षापासून बंद असलेला रासाका उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी दिलेला शब्द पाळत तो सुरू करून दाखविला. रासाका प्रमाणेच निसाका साठी देखील कायद्यात बदल करून बाजार समितीच्या माध्यमातून तो सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन आमदार दिलीप बनकर (mla dilip bankar) यांनी केले आहे.

कुंभारी येथे विविध विकासकामांच्या लोकार्पण (Dedication) व भूमिपूजन (bhumipujan) समारंभाप्रसंगी आमदार बनकर बोलत होते. याप्रसंगी राष्ट्रवादीचे ता. अध्यक्ष राजेंद्र डोखळे, जि.प. सदस्या मंदाकिनी बनकर, स्व. अशोकराव बनकर पतसंस्था चेअरमन रामभाऊ माळोदे, राजेंद्र बोरगुडे, बाळासाहेब बनकर, माधव ढोमसे, बाबासाहेब शिंदे, विलास वाघ, बाळासाहेब वाघ, गणेश ढोमसे, रवींद्र कोकाटे, मोहन जाधव, बापू गडाख आदी उपस्थित होते.

आ. बनकर पुढे म्हणाले की, गेल्या दोन वर्षांपूर्वी तालुक्यातील जनतेने विकासकामे करण्याची संधी दिल्याने रस्त्यांच्या दुरुस्तीसह इतरही कोट्यावधी रूपयांची विकासकामे साकारत आहे. येत्या काही दिवसात वावी येथील 220 के.व्ही. चे सबस्टेशन कार्यान्वित करून पूर्ण क्षमतेने शेतकर्‍यांना (farmers) विजपुरवठा (Power supply) उपलब्ध होणार आहे.

शेतीपिकांना पाणी देण्यासाठी दिवसा कायमस्वरूपी विजपुरवठा उपलब्ध होण्यासाठी ना.शरद पवार (sharad pawar) यांचेकडे पाठपुरावा सुरू आहे. तालुक्यातील प्रत्येक गावात आमदार निधीसह जि.प. शेषच्या माध्यमातून आत्तापर्यंत कोट्यावधी रुपयांची कामे मार्गी लागली असून तालुक्याच्या सर्वांगिण विकासासाठी कटीबद्ध असल्याचे आ. बनकर म्हणाले.

यावेळी राजेंद्र डोखळे म्हणाले की, आमदार दिलीप बनकर यांच्या रूपाने तालुक्याला विकासाभिमुख लोकप्रतिनिधी मिळाला आहे. त्यामुळे प्रत्येक गावच्या सर्वांगिण विकासाला महत्व दिले जाईल असे प्रतिपादन केले. याप्रसंगी कुंभारी सरपंच राजेंद्र जाधव, उपसरपंच शैला जाधव, सोसायटी चेअरमन रामदास जाधव, व्हा.चेअरमन उत्तम झेटे, बाळासाहेब मोते, भानुदास जाधव, भाऊसाहेब जाधव,

पोपट जाधव, वासुदेव घगाळे, चंद्रकांत झेटे, बाळासाहेब जाधव, बाळासाहेब घंगाळे, बाळकृष्ण घंगाळे, ज्ञानेश्वर घंगाळे, प्रकाश जाधव, संजय जाधव, बाळासाहेब झेटे, सचिन जाधव, संतोष नरुडे, बबन शेजवळ, एकनाथ जाधव, उत्तम जाधव, शरद घंगाळे, गणेश जाधव, लक्ष्मण जाधव, नितीन जाधव, दीपक जाधव, त्रंबक घगाळे, राजेंद्र झेटे, नाना घंगाळे, एकनाथ जाधव, दतु जाधव, राहूल जाधव, जयराम जाधव, संतोष जाधव, दीपक जाधव, दिलीप जाधव, सुनील जाधव, मनोज जाधव, अतुल चव्हाण आदींसह कुंभारी, पालखेड मिरचीचे, रानवड, सावरगाव, नांदुर्डी, देवपूर, पंचकेश्वर परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com