सहकार क्षेत्रात पारदर्शकता आणण्यासाठी प्रयत्नशील

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे प्रतिपादन
सहकार क्षेत्रात पारदर्शकता आणण्यासाठी प्रयत्नशील

नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad

व्यवस्थापन अकार्यक्षम असेल, नियमबाह्य कर्जपुरवठा (Illegal lending )केला असेल तर सहकारी बँक असो अथवा राष्ट्रीय बँक असो, खासगी असो किंवा परदेशी बँक असो, ती अडचणीत येतेच. जिल्हा बँका हे त्याचे चांगले उदाहरण आहे. संस्थेचे मालक याऐवजी विश्वस्त या नात्याने काम केले तरच संस्थेची भरभराट होते. सहकारी बँक असो की कारखाना, सभासद, शेतकर्‍यांनी कारभार्‍यांवर बारकाईने लक्ष ठेवावे. सहकार क्षेत्रात पारदर्शकता (Transparency in the field of co-operation)आणण्यासाठी आमचा प्रयत्न राहणार असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar )यांनी केले.

नाशिकरोड देवळाली व्यापारी सहकारी बँकेच्या (Nashik Road Deolali Merchant Co-operative Bank )अंबड-पाथर्डी शाखा उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री छगन भुजबळ, खा. हेमंत गोडसे, बँकेचे अध्यक्ष निवृत्ती अरिंगळे, उपाध्यक्ष सुधाकर जाधव, ज्येष्ठ संचालक दत्ता गायकवाड, जिल्हा उपनिबंधक डॉ. सतीश खरे, शिवसेना जिल्हाध्यक्ष विजय करंजकर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे,

गजानन शेलार, अजय बोरस्ते, विलास शिंदे, दिलीप दातीर, त्र्यंबकराव गायकवाड, लाला जैन, शशीताई आहिरे, राजाभाऊ जाधव, अजय ब्रम्हेचा, गोरखनाथ बलकवडे, अजित बने, वसंत अरिंगळे, प्रकाश घुगे, अशोक चोरडिया, सुनील चोपडा, अरुण जाधव, रमेश धोंगडे, यशवंत पागेरे, मंगेश फडोळ, बाबासाहेब जाधव, शरद वालझाडे, बंडू बोराडे, माजी नगरसेवक दिनकर आढाव, जगदीश पवार, संतोष साळवे,

सुषमा पगारे, आशा तडवी तसेच संगीता आढाव, शिवाजी भोर, शिवाजी डेमसे, विनोद देशमुख, रमेश औटे, अशोक खालकर, जयंत गाडेकर, अरुण महानुभाव, अशोक सातभाई, रामदास सदाफुले, मनोहर कोरडे, डॉ. प्रशांत भुतडा, रंजना बोराडे, श्रीराम गायकवाड, जगन आगळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

सहकारीतील अपप्रवृत्तीवर टिका करताना अजित पवार म्हणाले की, कधी कधी संस्थेला अडचणीतून बाहेर कढण्यासाठी राज्यकर्ते नियमबाह्य कामे करतात. साखर कारखान्यांना हमी देण्याचे सरकारने बंद केले आहे. मूळात हमी देण्याची वेळच आणू नका. स्वतःच्या पायावर उभे रहा. अडचणींवर स्वतःच मात करा.

राज्य सहकारी बँक 12 सहकारी साखर कारखाने चालविण्यास देणार आहे. कारखाना चालवणे येड्यागबाळ्याचे काम नाही. सहकार क्षेत्रात यशवंतराव चव्हाण, शरद पवार यांच्यासारख्या नेत्यांनी चांगली कामे केली त्याचा आदर्श नव्या पिढीने ठेवावा. अडचणींना मात करण्याची ताकद सहकार चळवळीत व कार्यकर्त्यांमध्ये आहे. लोकांची ठेव सुरक्षित राहिली पाहिजे. सहकार क्षेत्रात पारदर्शकता आणण्यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे.

देश पातळीवर आता सहकार खाते स्थापन झाले आहे. राज्यकर्त्यांना सहकारात बदल करण्याचा अधिकार आहे. देशपातळीवर सहकार चळवळ चांगली चालावी, तीला बळकटी प्राप्त व्हावी. शेतकरी, उद्योजक, व्यापारी यांना उभे करण्याचे काम सहकारातून व्हावे. जातपात, राजकारण बाजूला ठेवूनच सहकारात काम करावे. कर्ज मंजूर करताना वशिला एवजी पात्रता बघावी. सहकार क्षेत्र बळकट व्हावे, सर्वसामान्यांना उभे करण्यासाठी सहकारी बँकांनी काम करावे. कारभार चांगला करून, विश्वासर्हता वाढवून सहकाराला अधिक बळकटी द्यावी असे सांगताना नाशिकरोड व्यापारी बँकेच्या कामकाजाचे अजित पवारांनी कौतुक केले.

पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, 1961 साली संस्थापकांनी मोठ्या कष्टाने, नाशिकरोड व्यापारी बँक सुरु झाली. सचोटीने काम करून बँकेची प्रगती केली. त्यांचा वारसा सध्याचे संचालक यशस्वीपणे चालवत असल्यानेच बँकेचा वटवृक्ष झाला आहे. शेती, कारखानादारीत नाशिक आघाडीवर आहे. मात्र, सहकारात पिछाडीवर आहे. हे चित्र बदलले पाहिजे. आजारी बँकांवर चांगले, प्रामाणिक प्रशासक नेमले तर तेच बँकांना संकटातून बाहेर काढतील. प्रामाणिकपणे कष्टाने काम करणारी माणसेच सहकार क्षेत्राला वाचवू शकतील.

निवृत्ती अरिंगळे यांनी प्रास्ताविक भाषणात बँकेच्या प्रगतीची माहिती दिली. दत्ता गायकवाड म्हणाले की, गरीबांना पायावर उभे राहण्यासाठी या बँकेची स्थापना झाली. मधल्या काळात सहकारावर मोठे संकट आले. आमचीही बँक अडचणीत आली. मात्र, पारदर्शी काम करून आम्ही लोकांचा विश्वास संपादन केला, शिस्त व नियमांचे पालन केले. त्यामुळे बँक टिकली आणि आता वेगाने प्रगती करत आहे. निवृत्ती अरिंगळे म्हणाले की, अंबड-पाथर्डी शाखेचा व्यवसाय पंचवीस कोटींचा आहे. बॅँकेच्या 27 शाखा असून त्यापैकी स्वमालकीच्या जागेत ही पंधरावी शाखा आहे. संचालक, अधिकारी, कर्मचारी एकजुटीने आणि पारदर्शकतेने कामकाज करत आहेत. उपाध्यक्ष सुधाकर जाधव यांनी आभार मानले. प्रशांत कापसे यांनी सूत्रसंचालन केले.

Related Stories

No stories found.