आघाडीसाठी प्रयत्न : भुजबळ

मनपा निवडणूक आढावा बैठक
आघाडीसाठी प्रयत्न : भुजबळ

नाशिक । प्रतिनिधी Nashik

आगामी नाशिक महापालिका (Nashik Municipal Corporation) निवडणुकीत (election) राष्ट्रवादी काँग्रेसकडून (Nationalist Congress) शिवसेना (shiv sena) व काँग्रेस (congress) या महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) पक्षांशी सन्मानपूर्वक आघाडी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल.

निवडणुकीच्या (election) पार्श्वभूमीवर पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे, अशा सूचना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री (Minister of Food, Civil Supplies and Consumer Protection) तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ (District Guardian Minister Chhagan Bhujbal) यांनी केले.

आगामी नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली आज येथील कार्यालयात आढावा बैठक (Review meeting) पार पडली. यावेळी शहराध्यक्ष रंजन ठाकरे (City President Ranjan Thackeray), माजी खासदार देविदास पिंगळे (Former MP Devidas Pingale),

प्रदेश पदाधिकारी नानासाहेब महाले, दिलीप खैरे, बाळासाहेब कर्डक, शहर उपाध्यक्ष निवृत्ती अरिंगळे, महिला शहराध्यक्ष अनिता भामरे, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, विद्यार्थी शहराध्यक्ष अ‍ॅड. गौरव गोवर्धने, शहर सरचिटणीस संजय खैरनार, विधानसभा अध्यक्ष किशोर शिरसाठ, विभाग अध्यक्ष शंकर मोकळ, मनोहर कोरडे, मुजाहिद शेख, जिवन रायते, मकरंद सोमवंशी, प्रांतिक सदस्य महेश भामरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

ओबीसी आरक्षणाबाबत (OBC reservation) राज्यसरकार तसेच अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या (Akhil Bharatiya Mahatma Phule Samata Parishad) वतीने न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्याचा निकाल लवकरच येईल. परंतु निकालाची वाट न पाहता पक्षाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मनपा निवडणुकीच्या तयारीला लागावे. नाशिक मनपात राष्ट्रवादी काँग्रेसचे संख्याबळ सध्या कमी असले तरी यंदा आपल्याला ती भरपाई करावी लागणार आहे. करोनाच्या (corona) सर्व नियमांचे पालन करून उपक्रम राबवावेत, अशा सूचनाही भुजबळ यांनी केल्या.

राज्यात महाविकास आघाडी सरकारला (Mahavikas Aghadi government) राज्यातील जनतेची पसंती आहे. वरिष्ठ पातळीवर सन्मानजनक आघाडी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. तरीदेखील संपूर्ण जागांवर आपल्याला लढायची तयारी करण्यात यावी. त्यासाठी शहरात इच्छुक असलेल्या सर्व उमेदवारांनी आपापल्या वार्डात निवडणुकीच्या कामाला लागावे. निष्क्रिय पदाधिकार्यांना बदलून त्या ठिकाणी सक्रिय सदस्याला जबाबदारी देण्यात यावी. शहरातील सर्व सहा विभागांत वरिष्ठ पदाधिकार्यांची नेमणूक करण्यात येऊन जबाबदारीचे वाटप करण्यात यावे.

राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढवण्यासाठी अधिक जोमाने कामाला लागावे, असे आवाहन भुजबळ यांनी केले. यावेळी पदाधिकार्यांनी आपली मते मांडली. यावेळी आगामी नाशिक मनपा निवडणुक स्वबळावर लढण्याची इच्छा उपस्थित पदाधिकार्यांनी बैठकीत व्यक्त केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com