शिवसेना जिल्हाप्रमुखांचा पूतळा जाळला; शिवसैनिक आक्रमक

शिवसेना जिल्हाप्रमुखांचा पूतळा जाळला; शिवसैनिक आक्रमक

संगमनेर । प्रतिनिधी | Sangamner

शिवसेना (shiv sena) पदाधिकार्‍यांना दूर ठेवत संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे (District Chief Raosaheb Khewre) यांच्या पुतळ्याचे दहन (Effigy burning) करत त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी उफळून आली आहे.

शिवसेना ठाकरे गटातील पदाधिकार्‍यांंची निवड वादाचा मुद्दा ठरला आहे. गेला काही दिवसापासून लोकसभा मतदारसंघात (Lok Sabha Constituency) सुरु असलेल्या शिवसेनेतील अंतर्गत खदखदीमुळे ही बाब समोर आली आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या आदेशावरुन संपर्कप्रमुख बबन घोलप (Baban Gholap) यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे नवे पदाधिकारी जाहीर करण्यात आले होते. यात काही पदाधिकार्‍यांचे पद काढून घेण्यात आले होते. तर त्यांचा पदभार नव्या पदाधिकार्‍यांकडे सोपविण्यात आला. त्यामुळे पक्षातील अनेक निष्ठावंत नाराज झाले.

पदच्युत झालेल्या जुन्या पदाधिकार्‍यांनी जिल्हाप्रमुख खेवरे यांच्यावरील आपल्या निष्ठा कायम ठेवत त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर आपला निर्णय घेण्याचे जाहीर केले होते. दरम्यानच्या काळात शिर्डी लोकसभा मतदारसंघात (Shirdi Lok Sabha Constituency) थेट संपर्कप्रमुखांविरोधात जोरदार आंदोलने (agitation) करण्यात आली. एकीकडे जिल्हाप्रमुखांवर निष्ठा दाखविणारे आंदोलन दुसरीकडे पक्षविरोधी कारवाया करण्यात पुढे होते.

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Party chief Uddhav Thackeray) यांच्या आदेशावून झालेल्या नव्या पदाधिकार्‍यांच्या नियुक्तीला स्थगिती देण्याची आफत पक्षावर ओढावली होती. त्यामुळे या अंतर्गत वादाला जिल्हाप्रमुख खेवरे यांनीच खतपाणी घातल्याचा संशय शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाला. संतप्त झालेल्या शिवसेना कार्यकर्त्यांनी (Shiv Sena workers) आज नव्या-जुन्या पदाधिकार्‍यांना बाजूला ठेवत थेट रस्त्यावर उतरण्याची भूमिका घेतली. बस स्थानक चौकात एकत्र जमलेले या कार्यकर्त्यांनी जिल्हाप्रमुख खेवरे यांचा पुतळा खेवरे हटाव शिवसेना बचाव अशी जोरदार घोषणाबाजी केली.

नव्याने नेमलेली कार्यकारिणी ही जिल्हाप्रमुख खेवरे यांच्या मर्जीप्रमाणे नसल्याने नवीन कार्यकारिणीस स्थगिती देण्यासाठी खेवरे यांनी विशेष पुढाकार घेतला होता. त्यामुळे त्यांचा जाहीर निषेध करत असल्याची भूमिका कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. ज्यांना पदे मिळाली नाही, त्यांची माथी भडकविण्याचे काम त्यांनी केले. खेवरे यांच्या शिर्डी लोकसभा मतदारसंघात संपर्कप्रमुख घोलप यांच्या विरोधात आंदोलने झाल्याचा आरोप करण्यात आला.

या प्रकाराचा निषेध नोंदविण्यासाठी आणि रोष व्यक्त करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. जिल्हाप्रमुख खेवरे यांच्या स्वतःच्या तालुक्यात एकही पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य नाही. राहुरी, देवळाली प्रवरा नगरपरिषदेत एकही नगरसेवक निवडून आणणार्‍या जिल्हाप्रमुखांच्या विरोधात आंदोलन असल्याचे म्हटले निवडणुकीच्या तोंडावर असा प्रकार चिंताजनक असल्याचे शिवसैनिकांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com