प्राणी संरक्षण कायद्याची प्रभावी अमंलबजावणी होणार

-डॉ. बाबुराव नरवाडे : जिल्हास्तरीय प्राणी क्लेश प्रतिबंधक सोसायटीची बैठक
प्राणी संरक्षण कायद्याची प्रभावी अमंलबजावणी होणार
World Animal Day 2020

नाशिक । Nashik

जिल्हास्तरीय प्राणी क्लेश प्रतिबंधक सोसायटीच्या माध्यामातून महाराष्ट्र प्राणीसरंक्षण कायदा 1976 ची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी होणार, असे प्रतिपादन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त तथा सदस्य सचिव डॉ.बाबुराव नरवाडे यांनी केले.

दूरदृष्यप्रणालीद्वारे जिल्हास्तरीय प्राणी क्लेश प्रतिबंधक सोसायटीची सभा पार पडली. सभेस जिल्हा पोलीस अधिक्षक सचिन पाटील, जिल्हा वनअधिकारी आनंद रेड्डी सहाय्यक आयुक्त डॉ.शहाजी देशमुख, डॉ. गिरीष पाटील, डॉ.डि के चौधरी, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.विष्णू गर्जे, जिल्हा पशुनधन विकास अधिकारी डॉ.वैशाली थोरात, तसेच अशासकीय समिती सदस्य गौरव क्षत्रिय, भारती जाधव, शरण्या शेट्टी, महेंद्र अहिरे, आशिष यमगर आदी उपस्थित होते.

नरवाडे म्हणाले, जिल्हास्तरीय प्राणी क्लेश प्रतिबंधक सोयायटीची नोंदणी 8 मार्च 2021 रोजी सहायक संस्था संस्थानिबंधक यांच्यामार्फत करण्यात आली असून, त्याअनुषंगाने ही प्रथम सभा आयोजित करण्यात आली होती. या समितीत 7 शासकीय सदस्य असून अशासकीय सदस्य 11 निश्चित करण्यात आली आहे.

यापैकी 7 अशासकीय सदस्यांची निवड झाली असून उर्वरित 4 सदस्यांची नियुक्ती करणेबाबत प्रस्ताव समितीसमोर ठेवण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले .सहाय्यक आयुक्त डॉ. शहाजी देशमुख यांनी यावेळी जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक सोसायटी समितीची स्थापनेचा उद्देश यावेळी सदस्यांना सांगितला. प्राण्यांचे अनावश्यक वेदनांपासून संरक्षण करणे, राज्यात प्राणी कलेश प्रतिबंधक कायदा 1960 व त्याखालील नियम 1978 याची अंमजबजाणी करणे तसेच नियम 47 अन्वये जनावरांच्या वाहतुकीचे पालन करण्यासाठी समिती सतत कार्यरत रहाणार आहे.

नागरिकांमध्ये सदर कायद्यांची जनजागृती करणे, पशुंचा निवारा, पाण्याची सोय करणे, आजारी व जखमी पशुंवर पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचार करणे इत्यादी बाबत जर अनियमिता झाली तर समितीमार्फत त्यावर कार्यवाही होऊ शकेल, असेह डॉ. देशमुख यांनी सांगितले.

सहाय्यक आयुक्त डॉ.गिरीष पाटील यांनी यावेळी पाळीव प्राणी दुकान नियम 2018 व श्वानप्रजनन व विपणन नियम 2017 च्या अमंजबजावणीसाठी जिल्ह्यातील सर्व पाळीव प्राण्याची दुकाने, श्वान प्रजनन व विपणन केंद्र यांची नोंदणी करणे बंधकारक असून याबाबत योग्य ती जनजागृती होणे गरजेचे असल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले.

जिल्हा पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांनी वाहतुकीच्या वेळी होणाऱ्या प्राण्यांच्या क्रुरतेबाबत जनजागृती करण्यासाठी विविध संस्था व व्यक्तींचे प्रशिक्षण घेण्यात यावे, असे मत व्यक्त केले.जिल्हा वन अधिकारी डॉ. आनंद रेड्डी यांनी वन्यप्राण्यांच्या निवारा औषधोपचारसाठी जिल्हात निवारा केंद्र उभारण्यात येत असून वनखात्यामार्फत वन्यप्राणी हाताळणी व मानव वन्यप्राणी सहजीवन याबाबत वनखाते स्तरावर प्रशिक्षण आयोजित करणार असल्याचे सांगितले.

यावेळी पाळीव प्राणी दुकाने व संस्था चालकांचे प्रशिक्षण आयोजित करणे,मोकाट जनावरासाठी चारापणी सोय करणे, बेकायदेशीर घोडा बैल शर्यंतींवर कार्यवाही करणे, भटक्या कुत्र्यांचे परिसरानुसार टॅगिंग करून निर्बिकरणानंतर त्यांना त्याच परिसरात सोडणे, विनापरवाना खाजगी व्यवसाय करणारे पशुचिकित्सक यांची नोंदणी करून त्यांना ओळखपत्र देणे आदी सुचना यावेळी अशासकीय सदस्यांनी केल्या आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com