रब्बी हंगामावर यांत्रिकीकरणाचा प्रभाव

रब्बी हंगामावर यांत्रिकीकरणाचा प्रभाव

पालखेड बं. । वार्ताहर

दिंडोरी तालुक्यातील (Dindori taluka) बळीराजाने नुकतीच खरीप हंगामाची (kharip season) सांगता करून आता रब्बी हंगामासाठी कंबर कसली आहे. खरीप हंगामात बळीराजाला अनेक अस्मानी व सुलतानी संकटांचा सामना करावा लागला आहे.

करोणामुळे (corona) पिकवलेला शेती माल कवडीमोल भावाने विकावा लागला खरिपातील पिकांची अगोदरची स्थिती अतिशय उत्तम होती करोना काळात झालेले नुसकान आता भरून निघेल या अपेक्षा बळीराजा होत्या.

परंतु तालुक्यातील शेतकरी (farmers) वर्गावर कृत्रीम संकटांचा घाला निर्माण झाला. त्यात वातावरणातील बदल हवामानातील बदल कधी ऊन कधी थंडी तर कधी पाऊस यामुळे खरीप हंगामात जगाचा पोशिंदा शेतकरी पूर्णपणे हतबल झाल्याने खरीप हंगामात भांडवल अव्वाच्या सव्वा खर्च करून ही उत्पन्नाची अवक पदरात कवडीमोल पडली.

शेतकर्‍यांनी मिळेल त्या ठिकाणाहून कर्ज घेऊन भांडवल उपलब्ध करूनही होत्याचं नव्हतं झालं. त्यामुळे आता बळीराजा आशा यंदाच्या रब्बी हंगामावर असून शेतकरी वर्गाने यांत्रिकीकरणावर (Mechanization) भर देऊन प्रारंभ केला आहे.

त्यामुळे पारंपारिक शेती अवजारे (Traditional farming tools) आता नामशेष होऊन लाकडी शेती अवजारे बनवणारे कारागिरांवर उपासमारीची वेळ येते की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. यंदा पाण्याचे प्रमाण मुबलक असल्यामुळे व रब्बी हंगामाच्या सुरुवातीलाच थंडीचे आगमन झाल्याने तालुक्यात गहू व हरभरा पिकांच्या उत्पन्नाच्या क्षेत्रात वाढ होण्याचे चिन्ह दिसत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com