रब्बी हंगामावर यांत्रिकीकरणाचा प्रभाव

रब्बी हंगामावर यांत्रिकीकरणाचा प्रभाव

ओझे। वार्ताहर Ozhe

दिंडोरी तालुक्यातील (dindori taluka) बळीराजांने नुकतीच खरीप हंगामाची (kharif season) सांगता करून आता रब्बी हंगामासाठी (rabbi season) कंबर कसली आहे. खरीप हंगामात बळीराजांला अनेक अस्मानी व सुलतानी संकटाचा सामना करावा लागला आहे. करोनामुळे (corona) पिकविलेला शेती माल कवडी मोल भावाने विकावा लागला.

खरीपातील पिकांची अगोदरची स्थिती अतिशय उत्तम होती. करोना काळात झालेले नुकसान आता भरून निघेल. या अपेक्षा बळीराजां होता. परंतु तालुक्यातील शेतकरी (farmer) वर्गावर कृत्रिम संकटाचा घाला निर्माण झाला. त्यात वातावरणातील बदलाव, हवामानातील बदल (Climate change), कधी ऊन, कधी थंडी (cold), तर कधी पाऊस, यामुळे खरीप हंगामात जगाचा पोशिंदा शेतकरी पुर्णपणे हतबल झाला.

खरीप हंगामात भांडवल अव्वाच्या सव्वा खर्च करून ही उत्पन्नाची आवक पदरात कवडी मोल पडली. मिळेल ठिकाणाहून कर्ज घेऊन भांडवल उपलब्ध केले. परंतु या सर्व संकटामुळे उत्पन्न हातात काहीच आले नाही. शेवटी थोडे फार राहिलेले पिके वाचविण्यासाठी शेतकरी वर्गाने जीवाचे रान केले. परंतु परतीच्या पावसाने बळीराजांच्या पिकांचे अतोनात नुकसान करून होत्याच नव्हते करून टाकले.

आता पुढील रब्बी हंगाम कसा घ्यावा. हा सवाल निर्माण झाला. यंदाचा रब्बी हंगाम हा शेतकरी वर्गाने यांञिकीकरणावर भर देऊन प्रारंभ केला आहे. त्यामुळे पारंपारिक शेती औजारे आता नामशेष होऊन लाकडी शेती औजारे बनविणारे कारागिरांवर उपासमारीची वेळ येते की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. यंदा पाण्याचे प्रमाण मुबलक असल्यामुळे व रब्बी हंगामाच्या सुरुवातीलाच थंडीचे आगमन झाल्याने तालुक्यात गहू व हरभरा पिकांच्या उत्पन्नाच्या क्षेत्रात वाढ होण्याचे चित्र दिसत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com