भात शेती
भात शेती
नाशिक

इगतपुरी : भात आवणीवर करोनाचे सावट

मजुरांची वाणवा

Gokul Pawar

Gokul Pawar

आहुर्ली । Ahurli

इगतपुरी तालुक्यात कोरोनाचे प्रादुर्भाव वाढत असल्याने याचा परिणाम शेतीवर झाला आहे. सध्या भात आवणीचे काम सुरु झाल्याने करोनामुळे मजूर मिळेनाशे झाले आहे.

दरम्यान सर्वत्र करोनाचा परिणाम जाणवत असून शेती व्यवसायालाही बसला आहे. इगतपुरी तालुका भात शेतीसह नागली, वरई आदी खरिप पिकाचे आगर मानला जातो. यंदा मात्र करोनाच्या भीतीची गडद छाया खरिप लागवडीवर पडली आहे. ऐन भात, नागली, वरई आवणीच्या कामास मजुर मिळेनासा झाला असल्याचे चित्र दिसुन येते आहे. दरम्यान मजुराच्या टंचाई मुळे मजुरीचे दरही कडाडले असुन शेतकरी चिंताक्रांत झाला आहे.

इगतपुरी शहरासह ग्रामीण भागात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. यामुळे अनेक गावांना लॉक डाऊन असून सुरक्षितता म्हणून शेतीकामे थांबलेली आहेत. गाव खेडयात वाढत असलेला कोरोनाचा प्रभाव नागरिकांना सतावत आहे. या भागात खरिप आवणीच्या कामानीं वेग घेतला आहे. मात्र कोरोनाच्या भितीमुळे मजुर एकमेकांच्या शेतात काम करण्यास नकार देत आहे. याचा परिणाम मजुर उपलब्धतेवर झाला आहे. तर दुसरीकडे मजुरीचे दर ही कडाडले असुन ३०० रुपये प्रति माणसी दर, दुपारचे जेवण, दोन वेळा चहा आणि मजुर बाहेरचा असेल तर त्याचे गाडीभाडे किमान ५० रुपये अशी एकुण सरासरी पाचशे रुपयापर्यत मजुरी दयावी लागत आहे. त्यामुळे यंदा करोनामुळे शेतकऱ्यांचेही आर्थिक गणित बिघडले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com