प्रातिनिधिक
प्रातिनिधिक
नाशिक

माध्यमिक उपशिक्षणाधिकारी एसीबीच्या जाळ्यात

सहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना पकडले

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक : Nashik

जिल्हा परिषदेचे माध्यमिक उपशिक्षणाधिकारी भाऊसाहेब तुकाराम चव्हाण यांना सहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शुक्रवारी (दि.१०) सायंकाळी रंगेहात अटक केली आहे.

नाशिक जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागातील उप शिक्षणाधिकारी भाऊसाहेब चव्हाण यांनी शिक्षक पती-पत्नीकडून सेवा पुस्तिकेवरी स्वाक्षऱ्या करण्यासाठी १५ हजार लाच मागितली होती. या रकमेत तडजोड करून १५ हजार रुपयांऐवजी सहा हजार रुपये घेऊन स्वाक्षऱ्या करण्याचे ठरले होते.

या घटनेची माहिती लाचलुुचपत प्रतिबंधक विभागाला मिळताच विभागाचे उपअधीक्षक विजय जाधव यांच्या नेतृत्वातील पथकाने शुक्रवारी सायंकाळी माध्यमिक शिक्षण विभागाच्या कार्यालयात सापळा रचला होता.

यावेळी भाऊसाहेब चव्हाण यांना शिक्षक पती-पत्नीकडून सेवा पुस्तिकेवर स्वाक्षऱ्या करून त्याची पूर्तता करण्यासाठी सहा हजार रुपये घेताना रंगेहाथ पकडून अटक करण्यात आल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक दिनकर पिंगळे यांनी दिली.

Deshdoot
www.deshdoot.com