शिक्षण सेतूच्या माध्यमातून पाड्यांपर्यंत शिक्षणाची गंंगा

शिक्षण सेतूच्या माध्यमातून पाड्यांपर्यंत शिक्षणाची गंंगा

नाशिक । नरेंद्र जोशी Nashik

करोना संकटाच्या काळातही शिक्षणात खंड पडू नये म्हणून आदिवासी विकास विभागाने ( Department of Tribal Development )आश्रमशाळेतील ( Aashram schools )खेड्यापाड्यापर्यंत जाऊन शिक्षण सेतूच्या ( Shikshan Setu ) माध्यमातून शिकवण्यास सुरुवात केली आहे.

विशेष म्हणजे शिक्षक दारापर्यंंत जाऊन शिकवत असल्याने विद्यार्थी व पालक दोघांकडून या उपक्रमाला भरघोस प्रतिसाद मिळत आहे. शिक्षक गेले नसते तर पहिली, दुसरीच्या विद्यार्थ्यांनी अबकडही गिरवले नसते. अचानक तिसरीच्या वर्गात गेल्यावर त्यांना पहिलीचे धडे गिरवावेे लागले असते.

आदिवासी विकास विभागाच्या शिक्षण विभागातर्फे राज्यात 542 आश्रमशाळा कार्यरत आहेत. त्यात दोन लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यात पहिली पासून बारावी पर्यंतचा समावेश आहे.त्यांच्यासाठी एक दोन खेडे - पाडे मिळून एकेका शिक्षकाची नियुक्ती केली आहे. ते शिक्षक गावात जातात.

शिक्षणासाठी अनलॉक लर्निंग पुस्तिका उपलब्ध केल्या आहेत. त्यांच्या माध्यमातून गावात वर्गे घेतले जातात. एक दिवसाआड एका गावात जाऊन प्रत्यक्ष विद्यार्थ्यांंच्या अडचणी शिक्षक समजून घेत असल्याने विद्यार्थ्यांनाही अभ्यासक्रम समजण्यास मदत होत आहेे. याचा आनंद पालकांनाच जास्त होत आहे.

कारण पालक स्वतः शिकवू शकत नव्हते. शिकवायचा प्रयत्न केला तर मुले शिकत नव्हती. घरात चिंतेचे वातावरण होते. मुलेही घरात राहून त्रासली होती. आता जेथे मोबाईल उपलब्ध नाहीत. मोबाईल असले तरी रेंज मिळत नाही. तेथे या शिक्षणाचा चांंगला फायदा होत आहे.

समाज मंंदिर, एखाद्या देेवळाच्या मोकळया जागी करोना बाबतच्या सर्व नियमांचे पालन करुन विद्यार्थी शिक्षणाचे धडे गिरवत आहेत. ऑऩलाईन शिक्षणापेक्षा असे ऑफलाईन शिक्षण कधीही चांंगलेच अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

नाशिक, पेठ, सुरगाणा, कळवण, इगतपुरी, त्रंंबक, सटाणा या भागात एकेका तालुक्यात साधारण दहा, बारा गावात असे आश्रमशाळांचे विद्यार्थी आहेत.त्यांना अनलॉक स्वाध्याय पुस्तिकेच्या माध्यमातून शिकवले जात आहे. येथे शासनाची वीज पोहचली आहे.

काही घरांमध्ये वीज उपलब्ध नसते. अजूनही काही लोकं दिवाबत्तीचाच वापर करतात. काही ठिकाणी दळणवळणाच्या फारशा सुविधा उपलब्ध नाहीत. पाड्यावर आरोग्य सुविधा फारशा नाहीत. पावसाळ्यात गावाचा संपर्क तुटतो. अशा परीसरात शिक्षक पदरमोड करुन गेले नसते तर मुलांचे शिकणे थांबले असते. शिक्षकांचा ग्रामस्थ चांगला सन्मान करून त्यांचा हुरुप वाढवत आहेत.

भोकरपाडा, (ता. जि. नाशिक) हे ठिकाण होलदार नगर ते नळीची मेट रस्त्यावर डोंगराच्या कुशीत 8 ते 10 घरे मिळून वसलेला छोटासा पाडा आहे. नाशिक शहरापासून हे ठिकाण साधारण 70 कि. मी. अंंतरावर आहे. येथील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती-शेतमजुरी आहे. बरेचशे लोक रोजगारासाठी बाहेरच्या गावी जातात. भोकरीची झाडे मोठ्या प्रमाणात असल्यामुळे त्या ठिकाणाला भोकरपाडा असे नाव पडलेे.

पाड्यातील मुले, मुली शिक्षणासाठी आजुबाजुच्या आश्रमशाळा- धोंडेगाव, देवरगाव, वाघेरा, पिंपरी, वेळुंजे, रोहीले या ठिकाणी जातात. तेथे वसंतराव एकबोटे, रचना ट्रस्ट, नाशिक संचलित धोंडेगाव आश्रमशाळेचे शिक्षक विश्वास वाघमारे व तुपलोंढे जाऊन शिक्षण देत आहेत.

प्रत्यक्ष विद्यार्थी व शिक्षक भेटत असल्याने शंका समाधान होऊन शिक्षणाची गोडी कायम राहाते. पालक व विद्यार्थी यांच्या चेहर्‍यावरील आनंद कष्टाचे चीज झाल्याचे समाधान आहे.

डॉ. हिरालाल बावा, आसरबारी आश्रमशाळा ता.पेठ

शिक्षणाची गोडी कायम राहो

गेल्या दीड वर्षापासून मुले घरात होती. शिक्षणाची लागलेली गोडी कमी होईल की काय? अशी भिती वाटत होती. मात्र आता शिक्षण सेतूच्या माध्यमातून शिक्षक आमच्या खेड्या- पाड्यापर्यंंत येत असल्याने शिक्षणाची गोडी कायम ठेवणे शक्य झाले आहे. आता त्यात खंंड पडू नये, एवढीच अपेक्षा आहे.

भाऊराव कामडी, पालक

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com