गेल्या वर्षीची पुस्तकं नाहीत अन् सेतु म्हणतं मागील वर्षाचा धडा वाचा!

गेल्या वर्षीची पुस्तकं नाहीत अन् सेतु म्हणतं मागील वर्षाचा धडा वाचा!

नाशिक | Nashik

गेल्या वर्षभरात शिक्षणाचा पडलेला खंंड भरुन काढण्यासाठी सेतू (Setu) नावाचा ४५ दिवसांचा ब्रिज कोर्स शाळांसाठी तयार केला. तोही केवळ मराठी व उर्दू (Marathi & Urdu Medium) माध्यमासाठीच. हिंदी, इंग्रजी (Hindi & English) व इतर भाषांमधील मुलांसाठीचा ब्रिज कोर्स (Bridge Course) तयार करण्यात आला नाही.

आज निम्मे दिवस संपल्यानंतर सेमी इंग्रजीच्या मुलांना (Semi English Students) पिडीएफ पाठवल्या गेल्या आहेत. त्यामुळे ऑनलाईनवर कृतिशील अभ्यासक्रम (Experimental Education) शिकविणे जिकिरीचे झाले आहे. सेतू अभ्यासक्रम प्रवाहात नसणार्‍या मुलांना प्रवाहात येताना मागील वर्षीच्या महत्वाच्या भागाची ओळख व्हावी.

या चांगल्या हेतूने सुरु केलेला होता. प्रवाहात नसणारी मुले यावर्षी शाळेत येतील या गृहितकावर हा अभ्यासक्रम होता. वर्गातील प्रत्यक्ष अध्यापनावर आधारित असल्यामुळे ऑनलाईनवर कृतिशील अभ्यासक्रम (Online Experimental Study not possible) शिकविणे जिकिरीचे होत आहे. ते शक्य होत नाही.शहरात तर मुलांना ऑफलाइन शिकविले जाऊ शकत नाही.

त्यामुळे शिक्षक व विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यावर्षी शालेय पुस्तके अद्यापही शाळेत पोहोचलेली नाहीत.गेल्या वर्षीची पुस्तके शाळेत जमा करुन नवीन वर्गांना वितरीत करायला सांगितली होती. परिणामी आज मुलांकडे मागील वर्षाची पुस्तके नाहीत. सेतुमधे मागिल वर्षीची कविता वाचा किंवा धडा वाचून कृती करा, असे प्रश्न विचारले गेले आहेत.

त्यामुळे पुस्तकेच मुलांकडे नसल्यामुळे कृती सुटणार कशा? हा प्रश्‍न आहे? यात भरडला जात आहे तो शिक्षक. तो नोंदी ठेवता ठेवता मेटाकुटीला आला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com