शिक्षणाला कौशल्याची जोड गरजेची
USER

शिक्षणाला कौशल्याची जोड गरजेची

कौशल्य विकास व रोजगार उद्योजकता विभाग मंत्री नवाब मलिक

सातपूर । प्रतिनिधी Satpur

शिक्षणाला कौशल्याची जोड असल्यास जीवन यशस्वी होईल. स्वयंरोजगाराचे मार्गदर्शन घेऊन आपले जीवन समृद्ध करावे, असे आवाहन कौशल्य विकास ( Skill Development )व रोजगार उद्योजकता विभागाचे मंत्री नवाब मलिक यांनी केले.

जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व छत्रपती सेना यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक युवा कौशल्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये कौशल्य विकास व रोजगार उद्योजकता विभागाचे मंत्री नवाब मलिक, खा. हेमंत गोडसे यांनी उमेदवारांना मार्गदर्शन केले.

शासनाच्या सर्व महामंडळाच्या योजनांची माहीती एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावी या उद्देशाने जागतिक कौशल्य दिनाचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम फेसबुकच्या माध्यमातून थेट प्रक्षेपित करण्यात आला. यावेळी खा. गोडसे ( MP Hemant Godse )यांनी बेरोजगारीच्या आव्हानावर यशस्वीपणे मात करायची असेल तर कौशल्य विकास व स्वयंरोजगार हा राजमार्ग असल्याचे सांगितले.

याप्रसंगी जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालयाचे सह संचालक प्रफुल्ल वाकडे व सुनील सैंदाने उपयुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता नासिक विभाग यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. छत्रपती सेनेचे संस्थापक अध्यक्ष चेतन शैलार, कार्याध्यक्ष निलेश शेलार यांनी जास्तीत जास्त युवकापर्यंत महामंडळाच्या योजना पोहचवण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून जास्तीत जास्त युवकांनी या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कौशल्य विकास व रोजगार सहायक आयुक्त अनिसा तडवी, सूत्रसंचालन संदीप गायकवाड तर आभार सागर भाबड यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संजिवनी नाईकवाडे, प्रदिप गावित व जिल्हा कौशल्य विकास रोजगार कर्मचारी प्रयत्नशील होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com