शिक्षण मंत्री केसरकर अचानक पोहोचले पाथर्डी फाट्यावर

शिक्षण मंत्री केसरकर अचानक पोहोचले पाथर्डी फाट्यावर

इंदिरानगर | वार्ताहर | Indiranagar

महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे दीपक केसरकर यांनी अचानक काल रात्री नऊ वाजेच्या दरम्यान पाथर्डी फाटा येथील मंदिरात अचानक भेट दिली...

त्यामुळे परिसरात राजकीय चर्चानाही उधाण आले होते. पाथर्डी फाटा येथील ओम साईराम, सांस्कृतिक सामाजिक बहुउद्देशीय संस्था मुरलीधर नगर संचलित साईबाबा मंदिरला सदिच्छा भेट दिली. त्यांनी यावेळी साईबाबांचे दर्शन घेऊन आशीर्वाद ही घेतले.

यावेळी मंदिराच्या वतीने केसरकर यांचा मंडळाचे अध्यक्ष संदेश एकमोडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. साईभक्त असलेले दीपक केसरकर यांच्या अचानक भेटीमुळे परिसरात तर्कवितर्क वर्तवले जात आहेत.

साईंच्या भेटीची इच्छा असल्याने त्यांना पाथर्डी फाटा येथील मंदिरामध्ये दर्शनासाठी आणण्यात आल्याचे मंडळाचे अध्यक्ष संदेश एकमोडे यांनी सांगितले. यामागे कुठलाही राजकीय हेतू नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

शिक्षण मंत्री केसरकर अचानक पोहोचले पाथर्डी फाट्यावर
Navratrotsav 2022 : नाशिकमधील 'या' दहा देवींचे दर्शन घ्या एका क्लिकवर...

यावेळी उपाध्यक्ष संजय गायकवाड सचिव अण्णा साहेबांनी खजिनदार अनिल गायकवाड गोरख गायकवाड राजेंद्र गावडे योगेश चौधरी शुभम राजपूत संतोष विंचूर प्रदीप वाणी विशाल आहेर नितीन खैरनार संभाजी वाघमारे उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com