विकासासाठी शिक्षण महत्वाचे : आ. दराडे

विकासासाठी शिक्षण महत्वाचे : आ. दराडे

येवला | प्रतिनिधी | Yeola

देशाच्या स्वातंत्र्यसाठी योगदान देणारे थोर समाजसुधारक (Social reformer), सैनिक (soldier), शेतकरी (farmers) यांचे योगदान कदापी न विसरता येणार नाही.

देश विकासासाठी शिक्षण (education) हा सर्वात चांगला सन्मानाचा मार्ग असून विद्यार्थ्यांनी (students) सातत्याने शिकत रहावे असे प्रतिपादन आमदार नरेंद्र दराडे (MLA Narebndra Darade) यांनी केले.

जगदंबा एज्युकेशन सोसायटी (Jagdamba Education Society) संचलित बाभुळगाव येथील एस.एस.एम.विद्यालय व ज्युनिअर कॉलेज (SSM School and Junior College) येथे अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन (ndependence day) कार्यक्रमात आमदार दराडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी त्यांनी अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त मार्गदर्शन केले. प्रारंभी एसएनडी शैक्षणिक संकुलातील विविध महाविद्यालयांचे प्राचार्याच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन झाले.

आमदार दराडे यांनी ध्वजपूजन करून ध्वजारोहण (flag hoisting) केले ध्वजगीत व राष्ट्रगीताने (national anthem) मानवंदना देण्यात आली.प्राचार्य जी. एस. येवले यांनी प्रास्ताविकात महाविद्यालयातील उपक्रमांची माहिती देऊन प्रगतीचा उंचवणारा आलेख मांडला.विद्यार्थी राहुल पवार याने यावेळी देशभक्तीपर गीत सादर करून सर्वांचे मने जिंकली.

यावेळी एस.एन. डी. पॉलिटेक्निकचे प्राचार्य यु. बी. जाधव, बी. ए. एम. एस. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चव्हाण, नर्सिंगचे प्राचार्य नागराज, प्रसाद गुब्बी, मेजर भगवान रोकडे तसेच एसएनडी शैक्षणिक संकुलातील विविध महाविद्यालयांचे प्राचार्य,विभाग प्रमुख व प्राध्यापक उपस्थित होते.सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रदीप पाटील, किरण पैठणकर यांनी केले. प्राचार्य जी. एस. येवले, उपप्राचार्य ए. जी. कदम, विभागप्रमुख व्हि. आर. परदेशी, डी.एस. खोकले आदी उपस्थित होते.

अभियांत्रिकीत ध्वजारोहण

बाभूळगाव येथील एस.एन.डी.अभियांत्रिकी महाविद्यालय आणि संशधन केंद्रात संस्थेचे संचालक संकेत दराडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. देशात बदल घडवण्याची प्रचंड शक्ति आपल्या देशातील तरुण पिढीत आहे.कोणत्याही देशाचे भविष्य हे त्या देशातील तरुण पिढीवरच अवलंबून असते. म्हणून देशाची सेवा करणे आणि देशाच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे हे आपले म्हणजेच तरुण पिढीचे कर्तव्य असल्याचे ते यावेळी म्हणाले. यावेळी प्राचार्य डॉ. डी. एम.यादव, विभागप्रमुख डॉ.उबेद अन्सारी, प्रशासकीय अधिकारी

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com