शिक्षण विभागाचा लॉगईन आयडी, पासवर्ड हॅक

विनाअनुदानित शाळा अंशत: मान्यता यादीत समाविष्ट; संगणक परिचालक निलंबित
शिक्षण विभागाचा लॉगईन आयडी, पासवर्ड हॅक

नाशिक । प्रतिनिधी Nashik

कंत्राटी पध्दतीवर असलेल्या संगणक परिचालकाने (Computer Operator )शिक्षण उपसंचालक व शिक्षण संचालकांचा लॉग ईन आयडी व पासवर्ड हॅक (Hack login id and password of director of education) करीत जिल्ह्यातील विनाअनुदानित शाळांना अंशत: मान्यता यादीत समावेश केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार उघडकीस येताच जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने परीचालकास तातडीने निलंबित केले आहे. दरम्यान या शाळांची चौकशी आता सुरु झाल्याने संबंधित शाळांसह सेवकांचे धाबे दणाणले आहे.

प्राथमिक शिक्षण विभागात कंत्राटी पध्दतीवर संगणक परिचालक म्हणून कार्यरत असलेल्या इम्रान याच्याकडे ऑनलाईन डाटा एन्ट्रीची कामे होती. शिक्षण विभागात मंजूर झालेल्या फाईलची ऑनलाईन नोंदणी करताना विनाअनुदानित शाळेची नोंदणी अनुदानित शाळांच्या यादीत करुन त्यांना अप्रत्यक्षपणे फायदा त्याने मिळवून दिला.प्राथमिक शिक्षणाधिकारी,शिक्षण संचालक व उपसंचालकांच्या लॉगईन आयडी व पासवर्डही हॅक करुन परस्पर बदल केल्याची धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे शिक्षणाधिकारी डॉ.मच्छिंद्र कदम यांनी इम्रान यास तडकाफडकी निलंबित केले आहे.

कारवाई कोणावर?

अनेक वर्षांपासून एकाच पदावर काम करत असल्याने इम्रान यांस विभागाविषयी सर्व माहिती झाल्याचा त्यांनी गैरफायदा घेतला. ऑनलाईन अर्ज भरण्यात जाणिवपूर्वक त्रुटी ठेवल्याचे समोर आले आहे. याविषयी शिक्षण संचालक कार्यालयाकडून विचारणा झाल्यानंतर इम्रान यांचा घोटाळा उघडकीस आला. मात्र, एखाद्या विभागातील सेवक एवढ्या मोठ्या प्रमाणात घोटाळा करत असताना त्याचा सुगावा या विभागातील कोणालाही लागला नाही. थेट वरिष्ठांकडून विचारणा झाली तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. घोटाळ्याची चौकशी करुन कारवाई करायची झाली तर कारवाई कोणावर होणार असा मुद्दा उपस्थित केला जात आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com