गुरुगोविंदसिंग फाउंडेशनचे संस्थापक सरदार गुरदेवसिंग बिर्दी यांचे  निधन

गुरुगोविंदसिंग फाउंडेशनचे संस्थापक सरदार गुरदेवसिंग बिर्दी यांचे निधन

नाशिक:

सिंग इंजिनिअरींग या उद्योगसमूहाचे संस्थापक तसेच गुरुगोविंदसिंग फाउंडेशनचे संस्थापक व विद्यमान अध्यक्ष सरदार गुरदेव सिंग उर्फ बाबूजी (८९) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. गेल्या सुमारे ४३ वर्षापासून ते गुरुगोविंदसिंग फाउंडेशन संस्थेत कार्यरत होते. तसेच गेल्या ३१ वर्षांपासून ते फाउंडेशनच्या अध्यक्षपदी कार्यरत होते. गुरुगोबिंद ईंजिनिरिंग पब्लिक स्कूल, ज्युनिअर कॉलेज तसेच तंत्रनिकेतन व अभियांत्रिकी महाविद्यालय उभारणीत त्यांचा मोलाचा वाटा होता. संस्थेच्या कार्याची माहिती घेण्यासाठी प्रसिद्ध गझल गायक जगजीत सिंग यांनीही भेट देऊन बाबुजी कडून माहिती घेत संस्थेच्या कार्याची प्रशंसा केली होती.

नऊ विद्यार्थ्यांपासून सुरुवात झालेल्या या गुरुगोबिंदसिंग फाउंडेशनच्या विविध शैक्षणिक संस्थेत आता सुमारे ४००० विद्यार्थी शिकत आहेत.

सिंग इंजिनिअरींग या उद्योगसमुहात तयार होणाऱ्या विविध मशिनरीज या भारतातच नव्हे तर परदेशात ही निर्यात करीत आहेत.

सातपूर येथील औद्योगिक वसाहत स्थापनेत त्यांचा मोलाचा वाटा होता. नाईस चे माजी उपाध्यक्ष व संचालक या पदावरून त्यांनी भरीव कामगिरी केली होती. त्यांच्या कार्याची नोंद घेत त्यांना राष्ट्रपती पुरस्कार प्रदान करण्यात आला होता तसेच विविध संस्थाच्या वतीने अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या पश्चात २ मुले, २ मुली व नातवंडे असा परिवार आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com