पेट्रोलच्या शंभरीनंतर खाद्यतेलाचेही दर गगनाला

महागाई भडका : सर्वसामान्य मेटाकुटिस
पेट्रोलच्या शंभरीनंतर खाद्यतेलाचेही दर गगनाला

नाशिक । प्रतिनिधी

पेट्रोलच्या दराने शंभरीपार केली असतानाच आता किराणामालाचे भावही वाढले आहेत. विशेष म्हणजे खाद्यतेलाच्या दरात भरमसाट वाढ झाली असून ते दीडशेपार पोहचले आहे. मागील काही दिवसात खाद्यतेल दरात प्रति किलो २० ते २५ रुपयांची दरवाढ झाली आहे. महागाईच्या भडक्याने महिलांचे किचनचे बजेट कोलमडले आहे...

पेट्रोल व डिझेलचे दर रोज नवे उच्चांक गाठत अाहेत. पेट्रोलने शंभरीपार तर डिझेलने नव्वदी पार केली आहे. त्यामुळे माल वाहतुकीचा खर्च वाढला असून देशभरात महागाइचा भडका उडाला आहे.

जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले आहे. वाहतुकीच्या खर्चात वाढ होऊन सर्वच वस्तूंच्या दरांत दहा ते पंधरा टक्के वाढ झाली आहे. त्यातही खाद्यतेलाच्या आयात शुल्कातही मोटी वाढ झाल्याने पंधरा लिटरच्या तेलाच्या डब्यासाठी आता पंचवीशसे रुपये मोजावे लागत आहेत.

शेंगदाणा, सोयाबीन व सूर्यफुलाच्या तेलात चालू महिन्यात २० ते ४० टक्के दरवाढ झाली आहे. विशेष म्हणजे भारतात दरवर्षी ८० ते ८५ लाख टन तेलनिर्मिती होती. तर दरवर्षी शंभर ते दीडशे लाख टन परदेशातून आयात करावे लागते.

सूर्यफूल तेल मलेशिया तर सोयाबीन तेलाचा सर्वाधिक पुरवठा अमेरिकेतून होते. मात्र करोना संकटामुळे येथून तेलाची आवक घटली आहे. त्यामुळे देशभरातील बाजारपेठेत पुरवठा कमी पण मागणी जादा अशी परिस्थिती उद्भवली आहे.

त्यामुळे देशभरात खाद्यतेलाच्या किंमती गगनाला भिडल्याचे तेलाचे व्यापारी सांगतात. दरम्यान, पुढिल काही दिवस परिस्थिती हीच राहणार असल्याचे संकेत असल्याचे व्यापारी सांगतात.

एकूणच खाद्यतेल व किराणाचे दर गगनाला भिडल्याने गृहिणींचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. करोनातून अजूनही सर्वसामान्यांचे जीवन सावरले नसून आर्थिक तंगी असताना आता महागाईचा डबल बारचा मार सोसावा लागत आहे.

खाद्यतेलाची मागणी वाढली असून पुरवठा कमी असल्याने खाद्यतेलाचे दर कडाडले आहे. पुढिल काळात देखील हीच परिस्थिती राहण्याची चिन्हे आहेत.

कैलास मालपुरे, किराणा दुकानदार

खाद्यतेलाचे चालू महिन्याचा भाव (लिटरमध्ये)

१. सोयाबीन १४५ रू.

२. सनफ्लॉवर १७५ रू.

३. शेंगदाणा १७५ रु

४. राईसब्रॅन १६५ रु

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com