राष्ट्रीयकृत बँकांमुळे आर्थिक विकास : पेंडभाजे

राष्ट्रीयकृत बँकांमुळे आर्थिक विकास : पेंडभाजे

सुरगाणा । प्रतिनिधी Surgana

करंजाळी (Karanjali) महात्मा गांधी विद्यामंदिर (Mahatma Gandhi Vidyamandir) संचलित सुरगाणा (surgana) येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील (College of Arts, Science and Commerce) अर्थशास्त्र विभागातर्फे (Department of Economics) विद्यार्थ्यांची (students) शैक्षणिक भेट बँक ऑफ महाराष्ट्र (Bank of Maharashtra) सुरगाणा शाखा येथे संपन्न झाली.

शाखा प्रबंधक सचिन पेंडभाजे यांनी विद्यार्थ्यांना बँकेच्या कामकाजाविषयी विस्तृत माहिती दिली. राष्ट्रीयीकृत बँक (Nationalized Bank) कशा पद्धतीने कामकाज करतात या विषय सविस्तर सांगितले. आरबीआयच्या (RBI) नियमाप्रमाणे कशा पद्धतीने बँकांना कामकाज करावे लागते. त्यामध्ये रेपो रेट (Repo rate), रिव्हर्स रेपो रेट (Reverse repo rate), बँक दर (Bank rate), वैधानिक रोखता प्रमाण हे कशा पद्धतीने पाळले जातात याविषयी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली.

बँकांची प्राथमिक कार्य, दुय्यम कार्य, कर्ज आणि बिले वटविणे कर्जरोख्यांची खरेदी -विक्री या कार्याविषयी माहिती दिली. सचिन पेंडभाजे यांनी सांगितले की, राष्ट्रीयीकृत बँकांमुळे देशाचा आर्थिक विकास (Economic development) झपाट्याने होत गेला. देशातील दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांसाठी प्राथमिकता प्राप्त क्षेत्रासाठी विविध कर्ज योजना बँकांनी सुरू केल्या व बँकेचे दरवाजे सर्वसामान्य जनतेसाठी खुले केले गेले.

ग्रामीण भागातील लोकांची आर्थिक स्थिती बळकट करण्यासाठी राष्ट्रीयकृत बँकांची भूमिका महत्त्वाची आहे. खेड्यापाड्यातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत बँकिंग सुविधा राष्ट्रीयीकृत बँकांमुळे शक्य झालेले आहे. शेतकर्‍यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करण्यासाठी शेती व तसंम सर्व व्यवसायांना कर्जपुरवठा करण्याचे बँकांना निर्देश देण्यात आले आहे.

त्यामुळे राष्ट्रीयीकृत बँकांना शेतकर्‍यांना कर्ज पुरवठा मोठ्या प्रमाणात करावा लागतो. त्यासाठी बँकेला ग्राहकांसाठी किसान मिळावे सुद्धा भरवावे लागतात. बँकांच्या राष्ट्रीयीकरनानंतर ग्रामीण भागातील लोकांच्या बचतीला प्राधान्य देण्यात आले .बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात बँकांचा फार मोठा सहभाग आहे.

राष्ट्रीयीकृत बँकांना इतर खासगी बँकाबरोबर स्पर्धा करावी लागते. त्यामुळे सहाजिकच राष्ट्रीयीकृत बँकांच्या कामकाजात अलीकडे सुधारणा झालेल्या आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सुनील घुगे यांनी केले. आभार प्रा. कविता भोये यांनी मानले. यावेळी प्रा. एम. झेड.चौधरी यांच्यासह महाविद्यालयातील अर्थशास्त्र विषयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com