ओझरला गणेशोत्सव मंडळांनी बनवला कृत्रिम तलाव

गर्दी टाळूया, प्रशासनाला सहकार्य करूया..!
गणेश विर्सजन
गणेश विर्सजन

ओझर | Ozar

करोनाचा धोका लक्षात घेत ओझर गावातील मेनरोड मित्र मंडळाने, ओझर ग्रामपंचायत व ओझर पोलीस स्टेशन यांच्या संकल्पनेतून एक सामाजिक उपक्रम हाती घेत गेल्या दहा दिवसांपासून गणरायाचे विधिवत पूजन सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी अत्यंत साध्या पद्धतीने केली.

बाप्पाला निरोप देण्यासाठी शासनाने दिलेल्या नियमावलीनुसार सोशल डिस्टन्सिंग चे पालन करत गर्दी टाळून ओझर येथील मारुती नागरी सहकारी पतसंस्था येथे शुद्ध कृत्रिम विसर्जन तलाव मेनरोड मित्र मंडळाच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आला असून सर्व नागरिकांनी आपली गणेशाची मूर्ती या तलावात विसर्जित करावी असे आव्हान मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

याप्रसंगी खबरदारीचा उपाय म्हणून ग्रामपंचायतकडून निर्मल टाकण्यासाठी गाडी उपलब्ध करून दिली आहे. तसेच मूर्ती संकलनासाठी ग्रामपंचायत,पोलिस प्रशासनाने विशेष पथक तयार करण्यात आले आहे.

या पथकाद्वारे मूर्ती घेऊन येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची नोंद रजिस्टर मध्ये केली जाणार असून मूर्ती विसर्जित करण्यासाठी कोणत्याही प्रकारची गर्दी होणार नाही. यासाठी विशेष उपाययोजना करण्यात आली आहे.

तर पोलिस ठाण्यामार्फत बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याचे पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांनी सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com