'या' तारखेपासून होणार ‘इज ऑफ लिव्हिंग इंडेक्स’ सर्वेक्षण

'या' तारखेपासून होणार ‘इज ऑफ लिव्हिंग इंडेक्स’ सर्वेक्षण
USER

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

केंद्र सरकारच्या (central government) गृहनिर्माण आणि शहरी कामकाज मंत्रालयाद्वारे (Ministry of Housing and Urban Affairs) मागील दोन वर्षांपासून घेतल्या जात असलेल्या इज ऑफ लिव्हिंग इंडेक्स सर्वेक्षणाच्या (Ease of Living Index Survey) तिसर्‍या पर्वाची 1 नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे.

देशातील सर्व प्रमुख शहरांमध्ये त्या स्थानिक स्वराज्य संस्था (Local Self-Government) आणि शासनाचे इतर प्रमुख विभाग पायाभूत सुविधा उपलब्ध करून देत असतात. यासाठी शासन वेळोवेळी विविध योजनांच्या माध्यमातून ह्या सुविधा उत्तमत्तोम देण्याचे प्रयत्न करत असते. या सेवासुविधा आणि शहरातील नोकरी (job), शिक्षण (education), आरोग्य (health), वाहतूक (transprot), शहरातील हवामान (weather) या प्रमुख त्या त्या शहरातील राहणीमानाचा दर्जा अवलंबून असतो.

या सर्व सेवासुविधांचा आढावा घेण्यासाठी आणि त्यामध्ये सुधार करण्यासाठी शासन स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आणि सर्व इतर शासनाच्या विभागांकडून अर्बन आउटकम फ्रेमवर्कच्या (Urban Outcomes Framework) माध्यमातून प्रश्नावलीच्या स्वरूपात माहिती गोळा करत असते. यावर्षी सुद्धा 15 ऑक्टोबर पर्यंत हि सर्व माहिती केंद्र शासनाकडे (central government) सादर करण्यात आली आहे. प्रक्रियेचा प्रमुख भाग असलेल्या नागरिकांची मते जाणून घेण्याचा टप्पा म्हणजेच सिटीजन पर्सेप्शन सर्वेतून (Citizen Perception Survey) म्हणजेच इज ऑफ लिव्हिंग इंडेक्स सर्वेक्षणास 1 नोव्हेंबर ला सुरुवात होत आहे.

इज ऑफ लिव्हिंग सर्वेक्षण दिनांक 1 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर या कालावधीत होणार आहे . या सर्वेक्षणामध्ये भाग घेण्यासाठी https://eol2022.org /citizenfeedback या वेबसाइटला भेट विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. आपल्या नाशिक शहरासाठी 802776 हा स्थानिक स्वराज्य संस्था कोड देण्यात आला आहे.

लिंक (link) ओपन केल्यावर नाव, मोबाईल नंबर आणि माहिती भरल्यानंतर यानंतर रस्ते, पिण्याचे पाणी, आरोग्य, वाहतूक, बँक ,सार्वजनिक वाहतूक , शहरातील कायदा व सुव्यवस्था कशी आहे? अशा साध्या प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. 2018 नाशिक शहराला 21 तर 2020 साली 38 क्रमांक मिळाला होता. यावर्षी नाशिक शहराला आपले गुणांकन सुधारायचे असेल तर जास्तीत जास्त लोकांनी या सर्वेक्षणात सहभाग घेणे गरजेचे आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com