दिंडोरी तालुक्यात बाप्पाच्या आगमनाची आतुरता

गणेश मुर्ती बाजारात दाखल
दिंडोरी तालुक्यात बाप्पाच्या आगमनाची आतुरता

ओझे | Oze

दिंडोरी तालुक्यात आता बाप्पाच्या आगमनाची आतुरता लागली आहे. करोनावर मात करण्यासाठी नागरिकांनी आप आपल्या घरीच बाप्पाला विराजमान करण्यावर पसंती दिली आहे.

यंदा करोनाचे वातावरण व्यापक असल्यामुळे कुठलाही गाजावाजा न करता अगदी साध्या पद्धतीने गणपती बाप्पाच्या आगमनाची उत्सुकता लखमापूर व परिसरात लागली आहे.

बाप्पाच्या स्वागतासाठी करोनाचे शासकीय नियम पाळून विविध मंडळे सज्ज झाली आहे.

विविध ठिकाणी सोशल डिस्टंन्सचे नियम पाळून जागोजागी वेगवेगळ्या आकाराच्या गणपती बाप्पाच्या मुर्तीची दुकाने सजली आहे. तर सजावटीसाठी लागणारी साहित्याची खरेदी करण्यासाठी जनतेचा कौल वाढला आहे.

यंदा बाप्पाचे आगमन कुठलाही गाजावाजा न करता, कोणतीही मिरवणूक नाही. अगदी साध्या पध्दतीने करण्यावर प्रत्येक मंडळाने भर दिला आहे. यामुळे येत्या गणपती बाप्पाच्या स्थापने पासूनच सामाजिक बांधिलकीची जाणीव कशी चांगल्या प्रकारे जोपासली जाईल यावर अनेकांचा भर आहे.

यंदा सोशल डिस्टन्स पाळून मुर्ती खरेदी करतांना नागरिक दिसत आहेत. अनेक ठिकाणी घराजवळच बाप्पाच्या मुर्ती मिळु लागल्याचे चिञ अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. तर जागरूक भक्तांनी शासकीय नियमांचे पालन करण्यासाठी जास्त प्रमाणात ऑनलाईन खरेदीला पसंती दिली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com