आपली पिक पहाणी आता आपल्या हातात...

आपली पिक पहाणी आता आपल्या हातात...

शेनीत | Shenit

इगतपुरी तालुक्यातील (Igatpuri Taluka) धामणगाव गंभीरवाडी परिसरात इ-पिकपहाणी अँप (E PikPahani App) च्या माध्यमातून पीक पहाणी केली जात आहे. शेतकरी स्वतः या अँपचा वापर करून आपल्या पिकाची पाहणी करतांना दिसत आहेत.

या अँप ची परिसरातील लोकांना ओळख व्हावी यासाठी शेताच्या बांधावर इगतपुरी -त्र्यंबकेश्वर (Igatpuri-Trimbakeshwer) उपविभागाचे प्रांताधिकारी तेजस चव्हाण व इगतपुरी तालुक्याचे तहसीलदार परमेश्वर कासुळे (Tahsildar Parmeshwer Kasule) यांचे मार्गदर्शनाखाली गावचे तलाठी के जी सैय्यद यांनी धामणगाव (Dhamangoan),

गंभीरवाडी व अडसरे खुर्द तर शेणित परिसरातील साकुर, पिंपळगाव डुकरा या गावांना तुषार सुर्यवंशी, तर मोर पिंपळगाव, धामणी, बेळगाव तराले, कवडदरा घोटीखुर्द,भरवीर येथे संदीप कडणोर,नांदगाव, लक्ष्मीनगर, कृष्णनगर येथे मनोज मोरे, भरविर, पिंपळगाव घाडगा, निनावी येथे सारिका रोकडे यांनी या भागातील शेतकऱ्यांना अँप संदर्भात प्रात्यक्षिक करून दाखविले. तसेच त्यांच्या शंकांचे निरसन केले.

यासाठी प्रत्येक गावातील २० तरुण शेतकऱ्यांची निवड करण्यात आली असून त्यांना प्रशिक्षण (Training) तलाठी सैय्यद यांनी दिले आहे. तसेच त्यांच्यावर इतर शेतकऱ्यांना प्रशिक्षित करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.या अँप्लिकेशनमुळे शेतकरी आता आपली पिकपहाणी प्रत्येक हंगामनिहाय स्वतः करू शकतात. तसेच प्रशिक्षणात त्यांना निर्भेळ पिके, जलसिंचन साधने, पडीत क्षेत्र, बांधावरची झाडे कशाप्रकारे आपल्या 7/12 वर लावता येईल. याची माहिती देण्यात आली.

यामुळे नैसर्गिक आपत्ती वेळी अचूक नुकसान भरपाई देणे शक्य होणार आहे. तसेच शासनास पिकांची अचूक आकडेवारी मिळाल्याने त्याप्रमाणे पुढील योजना बाबत नियोजन करण्यास उपयोग होणार आहे. शासनाच्या या अँप बाबत ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. भविष्यात त्याचाच वापर मोठ्या प्रमाणात करणार असल्याचे मनोगत व्यक्त केले आहे.

सातबारा पीकपाणी शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा विषय असूत. त्यांना बँक कर्ज, शासनाच्या विविध योजना साठी पीकपाणी महत्वाची असते. त्यासाठी अनेक अडचणी निर्माण होत असत. अन् त्यातून वेळ ही वाया जात असे. आता शासनाने ई पीक पाहणी या ऍप च्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपल्याच हातातून मोबाईल द्वारे पीकपाणी करता येणार आहे. यामुळे वेळ, हेलपाटे मारण्याची गरज ही पडणार नाही.

- के .जी. सय्यद, तलाठी, धामणगाव

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com