४५ लाख मतदारांना मार्चमध्येच इ-ईपिक मतदान कार्ड मिळणार

४५ लाख मतदारांना मार्चमध्येच इ-ईपिक मतदान कार्ड मिळणार

नाशिक । प्रतिनिधी

जिल्ह्यातील ४५ लाख ६४ हजार १२९ मतदारांपैकी यंदा नव्याने नोंदणी झालेले ५६ हजार नवमतदारांची नोंदणी झाली आहे. या मतदारांना २८ मार्चपर्यंत इ-ईपिक मतदान कार्ड आहे. तर उर्वरित ४५ लाख ८ हजार १२० मतदारांना १ मार्चपासून हे डिजिटलाईज कार्ड मिळणार आहे. विभागाच्या संकेतथळावर गेल्यावर मतदाराला हे ओळखपत्र डाउनलोड करता येईल...

निवडणूक आयोगाच्या सुचनेनूसार जिल्ह्यात २०२० ते २०२१ या वर्षात विशेष पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला. त्यात नवमतदाराची नोंदणी करण्यात आली. तसेच दुबार व मयत मतदारांची नावे वगळण्यात आली.

मतदारांना डिजिटल मतदान कार्ड मिळावे यासाठी आयोगाकडून इ-ईपिकची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने ई पिक हे कार्ड आता विशेष पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत नव्याने नोंदणी केलेल्या मतदारांसाठीच उपलब्ध केले आहे.

जिल्ह्यातील ५६ हजार नवमतदारांची नोंदणी झाली. या मतदारांनाच ईपिक डाऊनलोड करता येणार असून, त्यापुर्वी मतदार यादीत नाव नोंदणी केलेल्या मतदारांना हे इ-ईपिक १ मार्चनंतर उपलब्ध होणार असल्याचे निवडणूक विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

निवडणूक आयोगाने इ-ईपिक अर्थात डिजिटल मतदार कार्ड देण्याची सुविधा यंदापासून सुरु केली आहे. १ जानेवारी २०२१ या आर्हता दिनांकावर मतदारांची नोंदणी करण्यात अाली. त्याची यादी १५ जानेवारी २०२१ रोजी प्रसिध्द करण्यात आली.

त्याच आधारावर सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर २०२०-२०२१ या वर्षात राबवि‌ण्यात आलेल्या विशेष मतदार नोंदणी पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत नव्याने नोंदणी झालेल्या मतदारांसाठीच इ-ईपिक ही सुविधा उपलब्ध केली होती.

२५ जानेवारी ते ३१ जानेवारी हा कालावधी त्यासाठी देण्यात आला होता. तर सोमवारपासून म्हणजे १ फेब्रुवारीपासून इ-ईपिक हे सर्वांसाठी उपलब्ध करण्यात आल्याचे सांगण्यात आले होते.

त्यासाठी युनिक मोबाईल नंबरही अनिवार्य करण्यात आला होता. पण आता सोमवारी आयोगाने हे कार्ड २०२०-२१ या वर्षातच नव्याने नोंदणी झालेल्या मतदारांनाच डाऊनलोड करता येईल. २८ फेब्रुवारीपर्यंत त्यांना ही सुविधा असेल.

त्यामुळे २०२०-२१ या वर्षापुर्वी नोंदणी झालेल्या मतदारांना हे कार्ड आताच उपलब्ध होणार नसून, ते १ मार्चापासून मिळणार असल्याचे निवडणूक शाखेच्या वतीने सांगण्यात आले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com