देवळाली कॅम्प । वार्ताहर Devlali Camp

पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरंक्षण मंत्री राजनाथसिंह यांचे नेतृत्वाखाली संरक्षण विभागाच्या वरीष्ठ कार्यलयाच्या वतीने कॅन्टोमेंट हद्दीतील नागरिकासाठी नागरी सेवा जलद गतीने देणे कामी ई-छावणी प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. त्याचा लाभ देवळालीती नागरिकानी घेण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कुमार यांनी केले आहे.

संरक्षण मत्रालयाच्या महानिदेशालयाच्या वतीने हा उपक्रम सुरू करण्यात आलेला असून भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड व ई-गव्ह. फाउंडेशन यांचे भागीदारीत सरंक्षण मंत्रालय, डायरेक्टर जनरल, डिफेन्स इस्टेट यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत हा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमात पहिल्या टप्प्यात ज्या सुविधांचा समावेश करण्यात आला आहे.

त्यात कॅन्टोमेंट बोर्डाशी संबंधित सार्वजनिक तक्रारीसाठी (पीजीआर), व्यापार परवान्यांसाठी अर्ज करणे (टीएल), एम कलेक्ट, मॉड्यूलरव्दारे पेमेंट, लीजचे नूतनीकरण तसेच विस्तारीकरण यासाठी अर्ज करणे या सर्व सेवा deolali.cantt.gov.in यावर उपलब्ध आहेत.

जनतेने कोठूनही, कधीही, कोणत्याही वेळेला तक्रार करावी. ऑनलाईन पेमेंट, तसेच विविध प्रकारच्या अर्जांसाठी या पोर्टलचा वापर करावा, कॅन्टोमेंट बोर्ड सोयिस्कर, जलद व प्रतिसादात्मक नागरी सेवा देण्यासाठी वचनबद्ध असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कुमार यांनी नमूद केले आहे.