शहरातील रस्त्यांवर धुळीचे साम्राज्य

शहरातील रस्त्यांवर धुळीचे साम्राज्य

नाशिक । Nashik

शहरासह जिल्ह्यात (District) सलग आठ दिवस झालेल्या संततधारेमुळे शहरवासीयांचे जनजीवन विस्कळीत झाले होते. आज रविवारी पावसाने (Rain) उघडीप दिल्यानंतर दिवसभर स्वच्छ सूर्यप्रकाश होता. तर अगोदर सततचा पाऊस आणि आता धुळीचे साम्राज्य यामुळे शहरवासीय विशेषता दुचाकीधारक हैराण झाले आहेत....

शुक्रवार (दि.८) पासून शहर व जिल्ह्यात पावसाने संततधार धरली होती. त्यामुळे रस्त्यावर पाणी (water) साचून अनेक ठिकाणी रस्त्यांची (Road) चाळण झाली असल्याचे चित्र आहे.रस्त्यावरील मोठमोठे खड्डे वाचवतांना वाहनधारकांना भर पावसात दुचाकी चालवताना कसरत करावी लागत होती.आता रविवारी पावसाने पूर्णता उघडीप दिल्यानंतर रस्त्यांवर धुळीच्या (dust) साम्राज्याने कब्जा केला आहे.

तसेच शहरातील विशेषता सर्वच भागातील डांबरी रस्त्यांवर (Asphalt Road) धुळीचे साम्राज्य आहे.अशीच परिस्थिती ग्रामीण भागात (Rural Area) देखील आहे. आता तर ऊन (heat) पडल्यामुळे रस्ते कोरडे झाले असून डांबरी रस्त्यावरील कच बाहेर आली आहे. वाहन त्यावरून गेले की धुळ मोठ्या प्रमाणात उडत आहे.यामुळे दुचाकी धारकांना पुढच्या मोठ्या गाडीच्या मागे वाहन चालवताना धुळीचा मारा सहन करत आपले वाहन चालवावे लागत आहे. शहरामध्ये ज्या भागात सिमेंटचे रस्ते (Cement Roads) झालेले आहेत त्या रस्त्यावर मात्र धुळ उडत नसल्याचे दिसून येत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com